लखीमपूर खीरी : व्हिडीओच समोर आलाय, आता तरी दोन अश्रू ढाळा -शिवसेना
लखीमपूर खीरी घटनेत झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूवरून शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला सुनावलं आहे. या घटनेसंदर्भातील काही व्हिडीओ आता समोर आले असून, यात शेतकऱ्यांना गाडीने उडवणाऱ्या व्हिडीओचाही समावेश आहे. या व्हिडीओकडे बोट दाखवत शिवसेनेनं मोदींवर हल्लाबोल केला. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे झालेला हिंसाचार आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना झालेली अटक या दोन्ही […]
ADVERTISEMENT

लखीमपूर खीरी घटनेत झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूवरून शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला सुनावलं आहे. या घटनेसंदर्भातील काही व्हिडीओ आता समोर आले असून, यात शेतकऱ्यांना गाडीने उडवणाऱ्या व्हिडीओचाही समावेश आहे. या व्हिडीओकडे बोट दाखवत शिवसेनेनं मोदींवर हल्लाबोल केला.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे झालेला हिंसाचार आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना झालेली अटक या दोन्ही घटनांवरून शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.
‘प्रियंका गांधी यांना योगी सरकारने अखेर अटक केली आहे. मागील 36 तासांपासून त्यांना सीतापूरमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले होते. ज्या घाणेरड्या जागेत प्रियंका गांधी यांना नजरकैद करून ठेवले होते, त्या जागेत प्रियंकांना स्वतः साफसफाई करावी लागत होती. हातात झाडू घेऊन कचरा काढणाऱ्या प्रियंकांचा एक व्हिडीओ जगभरात व्हायरल झाल्याने आपल्या देशाची छिःथू होत आहे. प्रियंका गांधी या काँग्रेसच्या सरचिटणीस म्हणून त्यांच्यावर राजकीय हल्ले होऊ शकतात, पण देशासाठी असीम त्याग करणाऱ्या व पाकिस्तानचे तुकडे करून भारताच्या फाळणीचा सूड घेणाऱ्या महान इंदिरा गांधींच्या त्या ‘नात’ आहेत, यांचे तरी भान प्रियंकांना बेकायदेशीरपणे कैद करणाऱ्यांनी ठेवायला हवे होते’, असं म्हणत शिवसेनेनं योगी आदित्यानाथ यांच्यावर निशाणा साधला.
लखीमपूर खीरी : ‘त्या’ आठ जणांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला; पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय?