Nitin Deshmukh यांना कोणी अडकवलं? ‘त्या’ तक्रारदाराची ऑडिओ क्लिप हाती
MLA Nitin Deshmukh news अकोला : शिवसेना (UBT) गटाचे आणखी एक आमदार चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची चिन्ह आहेत. अकोला जिल्ह्यातील बाळापुरचे आमदार नितिन देशमुख यांना लाच-लुचपत विभागाने चौकशीसाठी आणि जबाबासाठी हजर राहण्यासंबंधी नोटीस बजावली आहे. या नोटिसीप्रमाणे १७ जानेवारीला देशमुखांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परीक्षेत्र, अमरावती येथे उपस्थित राण्याबाबत सुचना देण्यात आली आहे. यावेळी सोबत मालमत्ता […]
ADVERTISEMENT
MLA Nitin Deshmukh news
ADVERTISEMENT
अकोला : शिवसेना (UBT) गटाचे आणखी एक आमदार चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची चिन्ह आहेत. अकोला जिल्ह्यातील बाळापुरचे आमदार नितिन देशमुख यांना लाच-लुचपत विभागाने चौकशीसाठी आणि जबाबासाठी हजर राहण्यासंबंधी नोटीस बजावली आहे. या नोटिसीप्रमाणे १७ जानेवारीला देशमुखांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परीक्षेत्र, अमरावती येथे उपस्थित राण्याबाबत सुचना देण्यात आली आहे. यावेळी सोबत मालमत्ता विवरणही सादर करण्यास सांगण्यात आलं आहे.
नितीन देशमुख हे शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे अत्यंत निष्ठावंत आमदार म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंच्या बंडात सहभागी न झालेल्या १६ आमदारांमध्ये देशमुखांचं नाव घेतलं जात. बंड केल्यानंतर शिंदेंना साथ न देता ते गुवाहटीच्या रस्त्यातून पळून आले होते. शिंदे गटाने सुरतला पळवून नेत गुवाहटीला जाण्यासाठी दबाव आणला, मात्र मी तिथून पळून आल्याचं नितीन देशमुख यांनी सांगितलं होतं.
हे वाचलं का?
दरम्यान, लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाची नोटीस आल्यानंतर आमदार नितीन देशमुख यांनी आपल्याविरुद्ध षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. तसंच यामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हात असल्याचा अप्रत्यक्ष आरोपही त्यांनी केला. आपल्याकडे तक्रारदार आणि शिंदे यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप असल्याचाही दावा त्यांनी केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आमदार देशमुख म्हणाले, तक्रारकर्ता आणि एकनाथ शिंदे यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप माझ्याकडे आली आहे. लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रारदार संदर्भात माहिती मागितली आहे. यात तक्रारदार तोच आहे, हे निष्पन्न झालं तर शिंदे आणि ‘त्या’ व्यक्तीची ऑडिओ क्लिप माध्यमांसमोर ठेवली जाईल. आतापर्यंत नागपूर पोलिस आणि अकोला लोहमार्ग पोलीस एसीबीकडून नोटीस प्राप्त झाली आहे. पण हे सर्व माझ्याविरुद्ध षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप देशमुख यांनी केला.
ADVERTISEMENT
३ महिन्यात ठाकरेंचा तिसरा आमदार लाच-लुचपतच्या रडारवर :
दरम्यान, नितीन देशमुख यांच्यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात शिवसेना (UBT) पक्षाचे आमदार वैभव नाईक यांना आणि डिसेंबर महिन्यात शिवसेना (UBT) पक्षाचे राजापूरचे आमदार आणि उपनेते राजन साळवी यांनाही लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाची नोटीस आली आहे. सध्या या दोन्ही नेत्यांची चौकशी सुरु आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT