‘एक नेता, एक झेंडा, एक मैदान… निष्ठेचा सागर उसळणार’ : ठाकरे गटाचा टीझर रिलीज

मुंबई तक

मुंबई : ‘एक नेता, एक झेंडा, एक मैदान… निष्ठेचा सागर उसळणार’ असं म्हणतं शिवसेनेतील ठाकरे गटाचा दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हा टीझर ट्वीट करण्यात आला आहे. “शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा!” असं आवाहन या ट्विट आणि टीझरमधून करण्यात आले आहे. एक नेता, एक झेंडा, एक मैदान… […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई : ‘एक नेता, एक झेंडा, एक मैदान… निष्ठेचा सागर उसळणार’ असं म्हणतं शिवसेनेतील ठाकरे गटाचा दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हा टीझर ट्वीट करण्यात आला आहे. “शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा!” असं आवाहन या ट्विट आणि टीझरमधून करण्यात आले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात होणार आहे. याच मेळाव्याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची छाप या संपूर्ण टीझरमध्ये पहायला मिळत आहे. “भगवा अटकेपार फडकणार, महाराष्ट्राची ताकद दिसणार” असं या टीझरमध्ये म्हटलं आहे.

कालच शिंदे गटानेही दसरा मेळाव्याचे अधिकृत पोस्टर आणि टीझर प्रसिद्ध केला होता. यामध्ये बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, शिवसेनेचा डरकाळी फोडणारा वाघ अशा शिवसेनेशी संबंधित सर्व प्रतिमांचा वापर केला आहे. या पोस्टरमध्ये ‘एक नेता एक पक्ष एक विचार एकलव्य एकनाथ,’ असा मजकूर लिहित आम्हीच खरी शिवसेना आहोत, असे सांगण्याचा प्रयत्न शिंदे गटाने केला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp