Tunisha sharma: 70 दिवसानंतर शीजान खानची तुरुंगातून सुटका; बहीण-आई भावूक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Tunisha sharma suicide case : टीव्ही मालिका अलीबाबा: दास्तान-ए-काबुल (Dastan e kabul) अभिनेता शीजान खानची (Shizan khan) अखेर तुरुंगातून सुटका झाली आहे. शीजान खान 70 दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर आला आहे. अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha sharma) आत्महत्या प्रकरणी शीजानला अटक करण्यात आली होती. अशा परिस्थितीत त्याच्या कुटुंबीयांनी त्याला बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. आता शेवटी शीजन घरी परतला आहे. (Shizan Khan out of jail after 70 days; Sister and mother emotional)

ADVERTISEMENT

शीजान खान तुरुंगातून बाहेर आला

शीजान खान तुरुंगाबाहेर माध्यमांशी बोलला नाही. त्याच्या बहिणीने सांगितले की, तो 70 दिवसांपासून तुरुंगात होता. आम्हाला 70 तास तरी द्या, आम्ही आमचं म्हणणं मांडू, असं त्याचे कुटुंबीय म्हणाले. शीजान तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याची बहीण आणि आई खूप भावूक झाल्या होत्या. सर्वजण त्याला मिठी मारून रडताना दिसले. या अभिनेत्याला 69 व्या दिवशी जामीन मिळाला.

एक चिठ्ठी अन् मिस्ट्री गर्ल, तुनिषा शर्माच्या आत्महत्येपूर्वी काय घडलं?

हे वाचलं का?

एक लाख जमा केले

28 वर्षीय शीजान खानला मुंबईच्या वसई कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. शनिवारी कोर्टाने अभिनेत्याबाबत हा मोठा निर्णय दिला होता. अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर.डी.देशपांडे यांनी शीजान खानला जामीन मंजूर करताना एक लाख रुपयांची सुरक्षा ठेव मागितली होती. अभिनेत्याचे वकील शरद राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, शीजानला न्यायालयाने अनेक कारणांमुळे जामीन मंजूर केला आहे.

Tinusha Sharma : तुनिषा आत्महत्या प्रकरणात शीनाज खान कसा अडकला?

ADVERTISEMENT

अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी शीजान खानला डिसेंबर २०२२ मध्ये अटक करण्यात आली होती. तुनिषाने शीजनच्या मेकअप रूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. यानंतर तिच्या आईने तुनिषाचा एक्स बॉयफ्रेंड आणि सहअभिनेता शीजान खानवर अनेक मोठे आणि गंभीर आरोप केले.

ADVERTISEMENT

तुनिषाच्या आईने गंभीर आरोप केले होते

तुनिषाची आई वनिता शर्मा यांनी सांगितले की, शीजानने अभिनेत्रीवर हात उचलला होता. तसेच, शीजान तिला उर्दू बोलण्यास आणि हिजाब घालण्यास सांगायचा, असे तिने सांगितले होते. तुनिषा शर्माच्या आईने शीजानच्या आई आणि बहिणींवरही आपल्या मुलीला भडकवल्याचा आरोप केला होता. या सगळ्याला उत्तर देताना शीजानच्या कुटुंबीयांनी सांगितले होते की, तुनिषाची आई तिचा छळ करत होती आणि पैशासाठी तिचा वापर करत होती, त्यामुळे अभिनेत्री डिप्रेशनमध्ये होती.

Tunisha Sharma Death : तुनिषा शर्माची आत्महत्या की हत्या? पोलिसांना खुनाचा संशय

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT