सोलापूर: Remdesivir इंजेक्शनचा तुटवडा, कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची सुरुय वणवण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सोलापूर: सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे शहर व जिल्ह्यातील रुग्णालये खचाखच भरले आहे. रुग्ण संख्या वाढल्याने कोरोनावरील औषधांचा देखील तुटवडा निर्माण झाला आहे.

ADVERTISEMENT

कोरोनावरील उपचारासाठी रेमडेसिवीर हे औषध सर्वात महत्त्वाचं समजलं जात आहे. पण आता याच रेमडेसिवीरच्या इंजेक्शनचा सोलापूरमध्ये तुटवडा भासत आहे. यामुळे रुग्णांच्या नातेवाईक वणवण भटकावं लागत आहेत.

सोलापूर शहरात आणि जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढल्याने रेमडेसिवीर इंजेक्शनांचा तुटवडा निर्माण झाला आहे. सोलापूरमध्ये अनेक ठिकाणी काल रात्रीपासून रुग्णांचे नातेवाईक मेडिकल दुकानासमोर रांगेत उभे राहून रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करत आहेत.

हे वाचलं का?

पण काही तासातच आलेला स्टॉक संपल्याने अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना खाली हातच परतावं लागत आहे. अनेक जण हात जोडून विनंती करत आहेत. मात्र तरीही त्यांना हतबलपणे माघारी परतावं लागत आहे. दुसरीकडे वेळेवर इंजेक्शन न मिळाल्याने रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे.

दुसरीकडे सोलापूरसह मराठवाड्यातील अनेक ठिकाण रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असल्याच्या तक्रारी येत आहे. मात्र, याबाबत प्रशासनाकडून नेमकी माहिती समोर आलेली नाही.

ADVERTISEMENT

इंजेक्शनचा तुटवडा होऊ नये यासाठी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात इंजेक्शनची खरेदी केली असल्याचं समजतं आहे. पण असं असताना सोलापूरमध्ये मात्र रेमडेसिवीरचा तुटवडा असल्याचं समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

ADVERTISEMENT

औरंगाबादमध्ये ऑक्सिजन बेड्सची कमतरता

एकीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता भासत असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये ऑक्सिजन सिलेंडरची देखील कमतरता भासत आहे. काही भागांमध्ये सिलेंडरच्या किमतींमध्ये वाढ झालेली दिसत आहे.

औरंगाबादची आरोग्यव्यवस्था व्हेंटीलेटरवर, ऑक्सिजन बेड्सची कमतरता

औरंगाबाद शहरात गेल्या काही दिवसांत वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे परिस्थिती बिघडत चालल्याचं चित्र आहे. औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचारांसाठी दोन हजार ऑक्सिजन बेड्सची सोय करण्यात आली आहे. परंतू सध्या वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे हे सर्व बेड्स रुग्णांनी भरलेले असल्याचं चित्र आहे.

औरंगाबादमध्ये आतापर्यंत १४ हजारांच्या वर कोरोनाचे सक्रीय रुग्ण सापडले आहेत. शनिवारी १ हजार ३९४ नवीन रुग्णांची भर पडल्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. ‘मुंबई तक’शी बोलत असताना औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्हा प्रशासन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न करत असल्याचं म्हटलं आहे.

काही ठिकाणी खासगी हॉस्पिटल्स आणि संस्थांकडूनही मदत मागितली जात असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्र्यांनी बोलवली तातडीची कॅबिनेट बैठक

दरम्यान, महाराष्ट्रात वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (4 एप्रिल) तातडीची कॅबिनेटची बैठक बोलावली आहे. राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी काय उपाययोजना हाती घ्याव्या लागतील याबद्दल चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे.

या बैठकीत राज्य सरकार लॉकडाउन लावण्यासंदर्भात निर्णय घेऊ शकतं असे संकेत मिळत आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT