Shraddha Walker: मनी ट्रान्सफरची चुकलेली तारीख आणि इंस्टाग्राम चॅट, कसा अडकला आफताब?
श्रद्धा वालकरची झालेली भयंकर हत्या हा देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. दिल्ली पोलिसांना आत्तापर्यंत श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकड्यांपैकी १३ तुकडे मिळाले आहेत. पोलिसांना मिळालेले मृतदेहाचे तुकडे हे महिलेचे आहेत असं पोलिसांना वाटतं आहे. डिएनए चाचणी झाल्यानंतरच या संबंधी पोलिसांना भाष्य करता येणार आहे. दिल्ली पोलीस इतर तुकड्यांचा शोध घेण्यासाठी आणि हत्यार कुठलं वापरलं त्यासाठी पुन्हा […]
ADVERTISEMENT

श्रद्धा वालकरची झालेली भयंकर हत्या हा देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. दिल्ली पोलिसांना आत्तापर्यंत श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकड्यांपैकी १३ तुकडे मिळाले आहेत. पोलिसांना मिळालेले मृतदेहाचे तुकडे हे महिलेचे आहेत असं पोलिसांना वाटतं आहे. डिएनए चाचणी झाल्यानंतरच या संबंधी पोलिसांना भाष्य करता येणार आहे. दिल्ली पोलीस इतर तुकड्यांचा शोध घेण्यासाठी आणि हत्यार कुठलं वापरलं त्यासाठी पुन्हा महरौलीच्या जंगलात आफताबला घेऊन जाणार आहेत. अशातच या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत.
पोलिसांनी काय म्हटलं आहे?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आफताबने सुरूवातीला हे सांगितलं होतं की २२ मे ला आमचं भांडण झालं आणि त्यानंतर श्रद्धा घर सोडून निघून गेली. निघून जाताना ती आपला मोबाइल घेऊन गेली बाकीच्या गोष्टी म्हणजे कपडे आणि इतर सामान हे ती इथेच सोडून गेली असंही सांगितलं होतं. तसंच त्यानंतर ती माझ्या संपर्कात नाही असंही आफताबने सांगितलं होतं. मात्र पोलिसांनी आफताब आणि श्रद्धा यांच्यातले कॉल रेकॉर्ड आणि लोकेशन तपासले तेव्हा वास्तव समोर आलं.
२६ मे रोजी नेट बॅकिंगद्वारे ५४ हजार ट्रान्सफर
पोलिसांना तपासादरम्यान समजलेली सर्वात मोठी गोष्ट ही होती की २६ मे रोजी श्रद्धाच्या नेट बँकिंग वापरून आफताबच्या अकाऊंटमध्ये ५४ हजार रूपये ट्रान्सफर करण्यात आले होते. २२ मे पासून आपण संपर्कात नाही असं आफताबने सांगितलं होतं मग २६ तारखेला पैसे कसे ट्रान्सफर झाले? हा प्रश्न पोलिसांना पडला होता. त्याचं उत्तर मिळालंच.
इंस्टाग्राम चॅटिंगचं लोकेशन महरौली भागातलंच
३१ मे रोजी श्रद्धाने इंस्टाग्राम चॅटवरून तिच्या मित्राशी चॅटिंग केल्याचं तपासात समोर आलं होतं. ते लोकेशन तपासलं तेव्हा ते महरौली भागातलंच असल्याची बाब समोर आली. श्रद्धाचा फोन महरौली पोलीस ठाणे परिसरातच आहे हे पोलिसांना लक्षात आलं. तसंच २६ हजारांचं ट्रान्झेक्शनही याच भागात झाल्याचं पोलिसांना कळलं.