Shraddha Walkar Murder : श्रद्धाच्या हत्येनंतर आफताबच्या फ्लॅटवर आलेल्या तरुणीची ओळख पटली

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आफताब अमीन पूनावाला… हे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलंय. त्याचं कारण म्हणजे श्रद्धा वालकर हत्या प्रकरण. आफताब पूनावालाने लिव्ह-इन पार्टनर श्रद्धाची हत्या केली आणि तुकडे करून मृतदेह फेकला. या प्रकरणाचा तपास करत असतानाच पोलिसांना असं कळलं की, श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे घरात ठेवलेले असतानाच आफताब फ्लॅटवर एका तरुणीला घेऊन आला होता. त्या तरुणीची ओळख पटवण्यात दिल्ली पोलिसांना अखेर यश आलंय.

ADVERTISEMENT

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पूनावालाविरोधात दिल्ली पोलीस सध्या पुरावे गोळा करताहेत. श्रद्धाच्या हत्येनंतर आफताबच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचीही पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.

आफताब पूनावालाने श्रद्धा वालकरची हत्या केली. तिचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवले. श्रद्धाच्या हत्येनंतर आफताब पूनावालाने डेटिंग अॅपवरून पुन्हा डेटिंग सुरू केलं. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवलेले असतानाच आफताब पूनावाला डेटिंग अॅपवर भेटलेल्या एका तरुणीला फ्लॅटवर घेऊन आला होता.

हे वाचलं का?

तर श्रद्धाचा जीव वाचला असता : तक्रार अर्ज समोर आल्यावर गृहमंत्री अन् पोलीस काय म्हणाले?

जून-जुलै मध्ये ही तरुणी आफताबच्या फ्लॅटवर आली होती. तपासात ही माहिती समोर आल्यानंतर दिल्ली पोलिसांकडून त्या तरुणीची ओळख पटवण्याचे काम सुरू होते. अखेर ती तरुणी शोधण्यात दिल्ली पोलिसांना यश आलंय.

ADVERTISEMENT

या तरुणीची आफताबशी ओळख डेटिंग अॅपवरून झाली होती. पोलिसांनी तरुणीची ओळख पटवली असून, तिची चौकशीही केली आहे. ही तरुणी मानसोपचार तज्ज्ञ आहे.

ADVERTISEMENT

श्रद्धा वालकर आणि आफताबचं तीन वेळा झालं होतं ब्रेकअप

आफताब पूनावालाने पोलिसांना चौकशीत असंही सांगितलं आहे की, श्रद्धाचं आणि त्याचं एक-दोन वेळा नाही, तर तीन वेळा ब्रेक अप झालं होतं. ब्रेकअप झालेलं असूनही आफता पूनावाला श्रद्धाला मारहाण करायचा. आफताबने मारल्यानंतर श्रद्धा रडायची, तिला आहे त्याच अवस्थेत सोडून आफताब निघून जायचा. त्यानंतर श्रद्धाला इमोशनल ब्लॅकमेल करून गयावया करायचा आणि मग ती त्याला माफ करायची’, असही आता समोर आलं आहे.

‘तुझे तुकडे करून फेकून देईन म्हणतोय’, श्रद्धाने 2 वर्षांपूर्वीच केली होती आफताबची तक्रार

इमरान नजीर खानने काय सांगितलं?

टीव्ही स्टार इमरान नजीर खानने ही माहिती दिली की, कोव्हिडनंतर एक इव्हेंट होता. त्या इव्हेंटनंतर एक क्लिनिंग कँपेन आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी श्रद्धाची आणि त्याची ओळख झाली होती.

श्रद्धा त्यावेळी काहीशी त्रासलेली दिसत होती. त्यामुळे इमरान नजीर खानने तिची चौकशी केली होती. त्यावेळी श्रद्धाने त्याला सांगितलं होतं की, माझा प्रियकर (आफताब) स्मोकिंग करतो आणि दारू पितो. त्यानंतर श्रद्धा आणि माझं काही फारसं बोलणं झालं नाही. तिच्या मृत्यूची बातमी आली त्यावेळी मला हे आठवलं असंही इमरान नजीर खानने सांगितलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT