सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरण : सोबत सेल्फी घेणारा निघाला फितूर?, ३ दिवस घराची केली रेकी

मुंबई तक

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या (Sidhu moose wala) हत्या प्रकरणात आता नवनवे खुलासे होत आहेत. पंजाबमधील हत्येचे कनेक्शन थेट पुण्यामध्ये येऊन पोहोचले आहेत. आता अजून एक माहिती समोर आली आहे. (Sidhu Moose wala murder Case) २९ मे रोजी सिद्धू मुसेवालाची हत्या करण्यात आली होती. तपासादरम्यान पंजाब पोलिसांना (Punjab Police) हत्येअगोदरचे एक सीसीटीव्ही (CCTV) फुटेज हाती लागले […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या (Sidhu moose wala) हत्या प्रकरणात आता नवनवे खुलासे होत आहेत. पंजाबमधील हत्येचे कनेक्शन थेट पुण्यामध्ये येऊन पोहोचले आहेत. आता अजून एक माहिती समोर आली आहे. (Sidhu Moose wala murder Case)

२९ मे रोजी सिद्धू मुसेवालाची हत्या करण्यात आली होती. तपासादरम्यान पंजाब पोलिसांना (Punjab Police) हत्येअगोदरचे एक सीसीटीव्ही (CCTV) फुटेज हाती लागले आहे. माहितीनुसार हा व्हिडिओ सिद्धू मुसेवालाच्या घराजवळचा आहे.

यामध्ये अनेक तरुण सिद्धू सोबत सेल्फी घेताना दिसत आहे. यातील एका तरुणावर पंजाब पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. हत्येअगोदर दोन-तीन दिवस मुसेवालाच्या घराजवळ हा तरुण दिसून आला आहे. पोलीस त्याला संशयित म्हणून ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत.

Sidhu Moose Wala वर गोळ्या झाडणाऱ्या पुण्यातल्या संतोष जाधवची आई म्हणते……

समोर आलेले सीसीटीव्ही फुटेज २९ मे रोजी सिद्धू मूसेवालाच्या घराजवळचे असल्याचे सांगितले जात आहे. सिद्धू मुसेवाला आपल्या त्याच कारमधून घराबाहेर पडला होता, ज्यामध्ये त्याची हत्या करण्यात आली होती.

संबधित सीसीटीव्हीमध्ये सिद्धू आपल्या कारमध्ये दिसत आहे आणि त्याला काही तरुणांनी गराडा घातला आहे. त्यामध्ये तो संशयित तरुण देखील दिसत आहे. त्याने शुटर्संना सिद्धू निघाल्याची माहिती दिल्याचा संशय पोलिसांना आहे.

Sidhu Moose Wala च्या हत्येचे धागेदोरे पुण्यापर्यंत; लॉरेन्स बिश्नोई गँगची ‘ती’ खेळी फसली

पोलीस या तरुणाकडे संशयित म्हणून पाहत आहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की या तरुणाने शूटर्संना मूसेवालाबद्दल माहिती दिली असावी. कारण यानंतर मुसेवाला पुढे गेल्यावर लगेचच दोन कारमधून आलेल्या आरोपींनी त्याच्यावर गोळ्या घातल्या.

या हल्ल्यानंतर सर्वजण पळून गेले. चौकशी केली असता तो सेल्फी घेणार तरुणही गायब असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp