Sanjay Raut: ‘मौन सबसे अच्छा उत्तर…’, राऊतांचं भुवया उंचवणारं ट्विट; यामागचा नेमका अर्थ काय?

मुंबई तक

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून राजकीय धुळवडच सुरु आहे. यात केवळ आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणि राजकीय कुस्ती सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. या सगळ्या विरोधक आणि सत्ताधारी दोघेही अजिबातच मागे नाही. पण या सगळ्यामुळे देशाच्या पातळीवर राज्यातील राजकीय वातावरण अत्यंत गढूळ असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशावेळी आता शिवसेनेची (Shiv Sena) मुलुखमैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे नेते […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून राजकीय धुळवडच सुरु आहे. यात केवळ आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणि राजकीय कुस्ती सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. या सगळ्या विरोधक आणि सत्ताधारी दोघेही अजिबातच मागे नाही. पण या सगळ्यामुळे देशाच्या पातळीवर राज्यातील राजकीय वातावरण अत्यंत गढूळ असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशावेळी आता शिवसेनेची (Shiv Sena) मुलुखमैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मात्र आज (29 मार्च) एक असं ट्विट केलं आहे. ज्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

राज्यात सत्ताबदल झाल्यापासून भाजपकडून सातत्याने शिवसेनेवर टीकेची झोड उठवली जात आहे. या सगळ्या टिकेला शिवसेनेचे नेते नेहमीच प्रत्युत्तर देतात मात्र, शिवसेना खासदार संजय राऊत हे विरोधकांवर असा काही शाब्दिक मार करत आलेत की, त्यामुळे विरोधक देखील घायाळ झाले आहेत. कधी पत्रकार परिषद तर कधी सामनातील अग्रलेख.. प्रत्येक पातळीवर संजय राऊत हे शिवसेनेसाठी ढाल बनून उभे राहिल्याचं पाहायला मिळालं आहे.

पण आता याच संजय राऊतांनी चक्क ‘मौन’ पाळण्याचा सल्ला आपल्या ट्विटरच्या माध्यमातून दिला आहे. संजय राऊत यांनी आपला एक फोटो पोस्ट करत त्यासोबत ‘कभी कभी मौन सबसे अच्छा उत्तर होता हैं…’ एवढाच मजकूर पोस्ट केला आहे.

संजय राऊत यांच्या याच पोस्टमुळे आता राजकीय वर्तुळात मात्र वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.

हे वाचलं का?