ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर आणि टिटवाळ्यात खड्डेच खड्डे
मिथिलेश गुप्ता, प्रतिनिधी, ठाणे ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरातील सर्व प्रमुख रस्ते तसेच शहराच्या अंतर्गत रस्त्यांवर जीवघेणे खड्डे झाल्याने नागरिकांना प्रवास करणे कठीण झाले आहे. खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना सातत्याने घडत असताना काही मिनिटांचे अंतर तासंतास लागत आहे. विशेष म्हणजे, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत, तर सर्वच विभाग तसेच महापालिका प्रशासन सर्व […]
ADVERTISEMENT

मिथिलेश गुप्ता, प्रतिनिधी, ठाणे
ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरातील सर्व प्रमुख रस्ते तसेच शहराच्या अंतर्गत रस्त्यांवर जीवघेणे खड्डे झाल्याने नागरिकांना प्रवास करणे कठीण झाले आहे. खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना सातत्याने घडत असताना काही मिनिटांचे अंतर तासंतास लागत आहे. विशेष म्हणजे, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत, तर सर्वच विभाग तसेच महापालिका प्रशासन सर्व काही जाणूनही याकडे दुर्लक्ष करत असल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रहिवाशांमध्ये तीव्र संताप आहे.
कल्याण डोंबिवली शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यांवर वाहनाने चालणे अत्यंत अवघड व धोकादायक आहे. खड्ड्यांमध्ये वाहने ये-जा करताना दिसत आहेत. नुकतेच कल्याणमधील टिळक चौकात खड्ड्यात दोन ज्येष्ठ नागरिक पडल्याने नागरिकांचे हात-पाय फ्रॅक्चर झाले आहेत. त्यांच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.