ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग! शिवसेना नगरसेवकाचं नियम धाब्यावर बसवून बर्थ-डे सेलिब्रेशन
एकीकडे मुंबईसह महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी राज्यातील संपूर्ण जनतेला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करायचा असेल तर नियमाचं पालन करण्याचं आवाहन केलं होतं. राज्य सरकारची माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीमही जोरात सुरु आहे. परंतू सरकारच्या या घोषणेचा खुद्द शिवसेनेच्या […]
ADVERTISEMENT
एकीकडे मुंबईसह महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी राज्यातील संपूर्ण जनतेला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करायचा असेल तर नियमाचं पालन करण्याचं आवाहन केलं होतं. राज्य सरकारची माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीमही जोरात सुरु आहे. परंतू सरकारच्या या घोषणेचा खुद्द शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनाच विसर पडलेला दिसत आहे. कल्याणमध्ये शिवसेना नगरसेवक नवीन गवळी यांच्या वाढदिवसानिमीत्त कार्यकर्त्यांनी चक्कीनाका परिसरात सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशनमध्ये बँड-बाजाच्या तालावर नवीन गवळी यांची कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेऊन मिरवणूकही काढली.
ADVERTISEMENT
परंतू हे सेलिब्रेशन करत असताना शिवसेनेचे नगरसेवक आणि कार्यकर्त्यांकडून कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवले जात होते. सेलिब्रेशनदरम्यान उपस्थित असलेल्या एकाही कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर मास्क नव्हता…तसेच सोशल डिस्टन्सिंगचाही यावेळी पूर्णपणे फज्जा उडालेला पहायला मिळाला. गवळी यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची कल्याण पोलिसांनी दखल घेतली असून याविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं समजतंय.
सेलिब्रेशनमध्ये झालेल्या नियमांच्या उल्लंघनापर्यंत हा विषय थांबला नाही. काहीवेळानंतर नवीन गवळी आपल्या घरी परतल्यानंतर त्यांचे काही कार्यकर्ते कार्यालयासमोर उभे होते. यावेळी तिकडे निलेश गवळी आणि महेश भोईर हे दोन तरुण आले. काही दिवसांपूर्वी निलेश गवळीचा जगदीश राठोड या तरुणासोबत भांडण झालं होतं. जगदीश राठोड हा नगरसेवक नवीन गवळी यांचा जवळचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो. निलेश आणि जगदीश यांच्यात चर्चा सुरु असताना त्यांच्या सोबत असलेल्या महेश भोईरने वाद घालायला सुरुवात केली.
हे वाचलं का?
या वादाचं रुपांतर काही क्षणातचं हाणामारीमध्ये झालं. यावेळी महेशने आपल्याजवळील रिव्हॉल्वरमधून नशेमध्ये गोळीबार करण्यास सुरुवात केली. एक गोळी परिसरात उभ्या असलेल्या गाडीला लागल्यानंतर परिसरात गोंधळ उडाला आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांमध्ये पळापळ सुरु झाली. सुदैवाने या प्रकारात कोणतीही जिवीतहानी झालेली नसली तरीही गोळीबाराची बातमी ऐकताच कोळशेवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन गोळीबार करणाऱ्या महेश भोईरला ताब्यात घेतलं आहे. त्याच्या दुसऱ्या साथीदाराचा शोध सुरु आहे. परंतू एकीकडे कोरोनामुळे परिस्थिती गंभीर होत असताना…खुद्द सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या नियमांच्या उल्लंघनाबद्दल लोकांमध्ये नाराजी दिसत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT