रेल्वेने प्रवास करणाऱ्या गरोदर महिलेने दिला गोंडस मुलीला जन्म, पोलिसांच्या समयसूचकतेचं कौतुक
सोलापूर रेल्वे पोलिसांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे एका गरोदर महिलेचा जीव वाचला असून वेळेत मिळालेल्या योग्य उपचारांमुळे या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सोलापूर पोलिसांनी यावेळी समयसूचकता दाखवत या गरोदर महिलेला स्ट्रेचरवर झोपवून स्वतः सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. याबद्दल सोलापूर पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पॅसेंजर गाडीने प्रवास करणाऱ्या भाग्यश्री जमादार (वय ३२, […]
ADVERTISEMENT
सोलापूर रेल्वे पोलिसांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे एका गरोदर महिलेचा जीव वाचला असून वेळेत मिळालेल्या योग्य उपचारांमुळे या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सोलापूर पोलिसांनी यावेळी समयसूचकता दाखवत या गरोदर महिलेला स्ट्रेचरवर झोपवून स्वतः सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. याबद्दल सोलापूर पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, पॅसेंजर गाडीने प्रवास करणाऱ्या भाग्यश्री जमादार (वय ३२, रा. कर्नाटक) यांना अचानक सोलापूर स्थानकात त्रास जाणवायला लागला. भाग्यश्री या वेदनेने विव्हळत असताना सोलापूर पोलिसांनी तात्काळ त्यांच्यासाठी स्ट्रेचर उपलब्ध करुन देत स्वतः भाग्यश्री यांना सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.
सिव्हील रुग्णालयात भाग्यश्री यांना वेळेत औषधोपचार देऊन त्यांची प्रसुती करण्यात आली. भाग्यश्री यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ASI चव्हाण, पोलीस शिपाई साळवी, पोलीस शिपाई कुलकर्णी, RPF चे अधिकारी नाबदे यांनी धावपळ करुन भाग्यश्री यांचा जीव वाचवण्यात मोलाची भूमिका बजावली. या कामगिरीबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT