Solar Eclipse : सूर्यग्रहण सुरक्षितपणे पाहताना काय काळजी घ्याल?
यंदा दिवाळीत सूर्यग्रहण होतं आहे. आज (२५ ऑक्टोबर) ला सूर्यग्रहण होणार आहे. या वर्षातलं हे शेवटचं सूर्यग्रहण आहे. २०२२ मधलं हे पहिलं सूर्यग्रहण आहे. दिवाळी आणि ग्रहण असा योग अनेक वर्षांनी जुळून आला आहे. भारतात सूर्यग्रहण संध्याकाळी ४.२९ ते ६.९ या वेळेत असणार आहे. सूर्यग्रहण ४.२९ ला सुरू होईल. या ग्रहणाचे वेध पहाटे ३.३० पासून […]
ADVERTISEMENT
यंदा दिवाळीत सूर्यग्रहण होतं आहे. आज (२५ ऑक्टोबर) ला सूर्यग्रहण होणार आहे. या वर्षातलं हे शेवटचं सूर्यग्रहण आहे. २०२२ मधलं हे पहिलं सूर्यग्रहण आहे. दिवाळी आणि ग्रहण असा योग अनेक वर्षांनी जुळून आला आहे. भारतात सूर्यग्रहण संध्याकाळी ४.२९ ते ६.९ या वेळेत असणार आहे. सूर्यग्रहण ४.२९ ला सुरू होईल. या ग्रहणाचे वेध पहाटे ३.३० पासून लागले आहेत.
ADVERTISEMENT
ग्रहण पाहताना काय काळजी घ्याल?
एक्स रे च्या फिल्ममधून किंवा कोणत्याही साध्या फिल्ममधून ग्रहण पाहू नये. त्यामुळे डोळ्यांना इजा होण्याची शक्यता खूप जास्त असते. खगोल तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार विशिष्ट चष्म्यातून हे ग्रहण पाहावे. हे चष्मे खास ग्रहण पाहण्यासाठीच तयार करण्यात आलेले असतात. साधी फिल्म किंवा एक्स रे यातून ग्रहण पाहण्याचा प्रयत्न केल्यास त्यामुळे डोळ्यातील कॉर्नियाला इजा होऊ शकते. ग्रहण काळातील सूर्याच्या अतिनील किरणांचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे साध्या डोळ्यांनी किंवा एक्स रे फिल्म किंवा साधी फिल्म यातून ग्रहण पाहणे टाळा.
सोलार एक्लिप्स गॉगल ग्रहण पाहण्यासाठी सर्वात सुरक्षित
सोलार एक्लिप्स गॉगल ग्रहण पाहण्यासाठी सर्वात सुरक्षित मानले जातात. त्यामुळे चांगल्या प्रतिचे सोलार एक्लिप्स गॉगल आणून त्यातून ग्रहण पाहावे. डोळ्याला गॉगल लावावा आणि त्यानंतरच सूर्याकडे पाहावं तसंच सूर्यावरून जेव्हा नजर हटवाल तेव्हाच हा गॉगल काढायचा आहे हे विसरू नका.
हे वाचलं का?
नेहरू तारांगणातर्फे ग्रहण पाहण्याची मोफत व्यवस्था
मुंबईतल्या नेहरू तारांगण या संस्थेतर्फे ग्रहण पाहण्याची मोफत व्यवस्था संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत करण्यात आली आहे. मुंबईतल्या वरळीमध्ये नेहरू तारांगण आहे. त्यामुळे वरळीत जाऊनही तुम्ही टेलिस्कोपद्वारे ग्रहण पाहू शकता. मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावर असलेलं महालक्ष्मी हे स्टेशन किंवा मध्य रेल्वे मार्गावर असलेलं भायखळा हे स्टेशन नेहरू तारांगण या ठिकाणी जाण्यासाठी सोयीचं आहे. तसंच दादर पश्चिम भागातूनही या ठिकाणी जाण्यासाठी बस सुटतात. त्यामुळे बसनेही या ठिकाणी पोहचता येतं.
घरच्या घरी ग्रहण पाहायचे असल्यास काय कराल?
एक बाय एक फूट आकाराचा पुठ्ठा घेऊन त्याला मध्यभागी एक इंच त्रिजेचे वर्तुळाकार छिद्र पाडावे. भिंत किंवा पडदा आणि दुसऱ्या बाजूला एक छोटा सपाट आरसा यामध्ये छिद्र पाडलेला पुठ्ठा धरावा. सूर्यग्रहण काळामध्ये सूर्याचे प्रतिबिंब सपाट आरशात पडून ते परावर्तित होऊन , पुठ्ठ्याच्या छिद्रातून भिंतीवर किंवा पडद्यावर पडेल, अशी योजना करावी. सूर्यग्रहण लागल्यापासून तर ग्रहण संपेपर्यंत आपल्याला सूर्याकडे न पाहताही, सूर्यग्रहण पाहता येऊ शकतं. त्याचा आनंद घेता येऊ शकतो.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT