आजारी वडिलांचा खून करुन दोन दिवस मृतदेह घरात लपवला
दारुच्या नशेत मुलाने आपल्याच वडिलांचा गळा आवळून आणि त्यानंतर ब्लेडच्या सहाय्याने गळा कापून खून केल्याची धक्कादायक घटना लोणी काळभोर परिसरात घडली आहे. महत्वाची बाब म्हणजे वडिलांची हत्या केल्यानंतर मुलाने घरातील इतर सदस्यांना धमकावत मृतदेह दोन दिवस घरातच ठेवल्याचं समोर आलंय. रहीम शेख असं मृत व्यक्तीचं नाव असून मुलगा नईम शेखला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ठाणे […]
ADVERTISEMENT
दारुच्या नशेत मुलाने आपल्याच वडिलांचा गळा आवळून आणि त्यानंतर ब्लेडच्या सहाय्याने गळा कापून खून केल्याची धक्कादायक घटना लोणी काळभोर परिसरात घडली आहे. महत्वाची बाब म्हणजे वडिलांची हत्या केल्यानंतर मुलाने घरातील इतर सदस्यांना धमकावत मृतदेह दोन दिवस घरातच ठेवल्याचं समोर आलंय. रहीम शेख असं मृत व्यक्तीचं नाव असून मुलगा नईम शेखला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
ADVERTISEMENT
ठाणे : २७ वर्षीय तरुणीचा रिक्षातून पडून मृत्यू, मोबाईल चोरांपासून स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात झाला अपघात
यावेळी पोलीस तपासात नईमने सात वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने आपल्या पत्नीवर ब्लेडने गळा कापून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत रहिम शेख हे केल्या काही दिवसांपासून सतत आजारी असल्यामुळे घरी झोपून असायचे. नईम शेखची बहिण शहनाज ही धुणीभांडी करुन घर चालवत होती. परंतू नईमला दारुचं व्यसन असल्यामुळे तो सतत दारुच्या नशेत गावात फिरत बसायचा.
हे वाचलं का?
मंगळवारी मध्यरात्री किरकोळ कारणावरुन नईमने आपली वडील रहिम शेख यांचा गळा आवळला. गळा आवळल्यानंतर रहीम यांची हालचाल बंद झाल्यामुळे नईमने ब्लेडच्या सहाय्याने आपल्या वडीलांचा गळा कापला. यावेळी बहीण शहनाज वडिलांच्या मदतीसाठी पुढे आली असता नईमने तिला धमकी देऊन गप्प बसवलं. यानंतर वडिलांचा मृतदेह ३६ तास कपड्यात गुंडाळून त्याने घरातच ठेवला.
यानंतर गुरुवारी नईमने आपल्या नातेवाईकांना वडिलांचं निधन झाल्याची माहिती देत संध्याकाळी ४ वाजता त्यांना दफनभूमीत नेणार असल्याचं सांगितलं. सासऱ्यांच्या निधनाची बातमी ऐकताच नईमची पत्नी अंत्यदर्शनासाठी घरी आली होती. यावेळी नईमचे सासरे आणि पत्नीला रहीम शेख यांच्या गळ्यावर वार झाल्याचं लक्षात आलं. शहनाजकडे याबद्दल विचारणा केली असता तिने नईमचं कृत्य सर्वांसमोर आणलं. यानंतर नईमच्या पत्नीने शहनाजच्या मदतीने पोलीस ठाण्यात याची तक्रार दिली. पोलिसांनी नईम शेखला ताब्यात घेतलं असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT