दारूसाठी पैसे न दिल्याने मुलाने केला आईचा खून, पुण्यातली धक्कादायक घटना

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आईकडे दारुसाठी पैसे मागूनही न दिल्याने पुण्यातील सिंहगड रोड परिसरात राहणार्‍या 32 वर्षीय तरुणाने साठ वर्षीय आईला लोखंडी सळई आणि हातातील कड्याने मारहाण करून खून केल्याची घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विमल दत्तोपंथ कुलथे (वय 60, रा. नर्हे) असे खून झालेल्या आईचे नाव आहे. तर आरोपी मुलगा सचिन कुलथे वय 32 याला अटक करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नर्हे आंबेगाव येथील महालक्ष्मी आंगण येथे मयत आई विमल दत्तोपंथ कुलथे आणि आरोपी मुलगा सचिन हे दोघे राहत होते. मात्र आरोपी मुलगा सचिन याला दारूचे खूप व्यसन असल्याने त्याची पत्नी वर्षभरापूर्वी सोडून गेली होती. तर वडिलोपार्जित जमीन विकून मिळालेल्या पैशातून घर चालत असत. सचिन हा कोणताही कामधंदा करीत नव्हता आणि दारूसाठी तो आईकडे पैसे मागायचा,यावरून दोघांमध्ये अनेक वेळा भांडण देखील झाली. सचिनच्या व्यसनाधीनतेमुळे नातेवाईक देखील त्यांच्या घरी जात नव्हते.

नेहमीप्रमाणे सचिन याने घटस्थापनेच्या दिवशी दारूसाठी आईकडे पैसे मागितले. मात्र आईने त्याला पैसे दिले नाही.त्यावरून सचिन याने लोखंडी सळई आणि हातातील कड्याने आईला मारहाण केली. यामध्ये आई विमल या गंभीर जखमी झाल्या. या घटनेची माहिती त्याने कोणालाही दिली नाही.यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आरोपीने सचिनने बहिणीला घटनेबाबत माहिती दिली.त्यानंतर आरोपी सचिन याला ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सिंहगड पोलिसांनी सांगितले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT