Vidhan Sabha अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहील ! भास्कर जाधवांच्या स्वप्नांना शरद पवारांनी लावला सुरुंग
विधीमंडळाचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन गाजवणाऱ्या तालिका अध्यक्ष भास्कर जाधवांच्या स्वप्नांना आता शरद पवारांनीही सुरुंग लावला आहे. नाना पटोलेंच्या राजीनाम्यानंतर रिक्त असलेलं अध्यक्षपद हे शिवसनेकडे घेऊन काँग्रेसला वनमंत्रीपद द्यावं अशी चर्चा सुरु असल्याचं भास्कर जाधवांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. परंतू शरद पवारांनी या शक्यता फेटाळून लावत अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच राहील असं स्पष्ट केलंय. “आम्हा तिन्ही […]
ADVERTISEMENT

विधीमंडळाचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन गाजवणाऱ्या तालिका अध्यक्ष भास्कर जाधवांच्या स्वप्नांना आता शरद पवारांनीही सुरुंग लावला आहे. नाना पटोलेंच्या राजीनाम्यानंतर रिक्त असलेलं अध्यक्षपद हे शिवसनेकडे घेऊन काँग्रेसला वनमंत्रीपद द्यावं अशी चर्चा सुरु असल्याचं भास्कर जाधवांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. परंतू शरद पवारांनी या शक्यता फेटाळून लावत अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच राहील असं स्पष्ट केलंय.
“आम्हा तिन्ही पक्षांचा स्वच्छ निर्णय झालेला आहे. विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच राहील. त्यामुळे कुणीही काही बोलायचा संबंध येत नाही. आम्हा तिन्ही पक्षांना काँग्रेसचा अध्यक्ष मान्य आहे आणि आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत”, असं म्हणत पवारांनी एका अर्थाने भास्कर जाधवांची दावेदारी निकालात काढली आहे. पवार बारामतीत पत्रकारांशी बोलत होते.
जाधवांच्या मनसुब्यांना Congress चा ब्रेक, आमच्याकडेही अनेक भास्कर जाधव आहेत – थोरातांचा टोला
दरम्यान काँग्रेसनेही अध्यक्षपदावर आपला दावा कायम असल्याचं स्पष्ट केलं आहे. “विधीमंडळाचं दोन दिवसीय अधिवेशन पार पडलं. तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधवांनी चांगली कामगिरी पार पाडली. पण हे पद शिवसेनेला देण्य़ाचा कोणताही विचार किंवा चर्चा झालेली नाही. आमच्याकडेही अनेक भास्कर जाधव आहेत”, असं म्हणत बाळासाहेब थोरातांनी अध्यक्षपदावर काँग्रेसचा दावा कायम असल्याचं सांगितलं.