राजस्थानमध्ये राजकीय घडामोडींना वेग, मुख्यमंत्रीपदाच्या चाव्या आमदारांच्या हातात?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राजस्थानमध्ये अशोक गहलोत यांच्या जागी दुसरा मुख्यमंत्री निवडण्यासाठी आज संध्याकाळी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. यासाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी वरिष्ठ नेत्यांना निरीक्षक म्हणून पाठवले आहे. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक गहलोत यांनी सचिन पायलट यांना मुख्यमंत्री होण्यास विरोध केला आहे. दरम्यान, नगरविकास मंत्री शांती धारिवाल यांच्या घरी गहलोत गटाच्या आमदारांची बैठक होत असून, त्याला केवळ 20 आमदार पोहोचले आहेत. हे लोक आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.

ADVERTISEMENT

अशोक गहलोत यांनी सचिन पायलट यांना विधिमंडळ पक्षाचे नेते बनविण्यास विरोध केल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी इंडिया टुडेला सांगितले आहे. आज संध्याकाळी होणाऱ्या बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे आणि अजय माकन उपस्थित राहतील, त्या बैठकीत आमदारांनी आपले म्हणणे मांडावे, अशी गहलोत यांची इच्छा आहे. त्याचवेळी पायलट यांना गांधी कुटुंबाकडून पाठिंबा देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. याशिवाय आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे की, राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केल्यानंतरच घ्यावा, अशी गहलोत यांची इच्छा आहे.

जयपूर येथे आज होणाऱ्या बैठकीला सोनिया गांधी यांनी पाठवलेले निरीक्षकही उपस्थित राहणार आहेत. खर्गे आणि अजय माकन तेथील परिस्थितीचे विश्लेषण करतील आणि त्यानंतर त्याचा अहवाल काँग्रेस अध्यक्षांना सादर करतील. 24 सप्टेंबरपासून काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत अशोक गहलोत यांचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे. त्याचवेळी राजस्थानच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यासाठी पक्षाने तयारी सुरू केली आहे. दरम्यान, गहलोत सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री रमेश मीणा यांनी आज तकशी बोलताना सांगितले की, पक्ष नेतृत्व म्हणजेच हायकमांड जो निर्णय घेईल तो सर्व आमदारांना मान्य असेल.

हे वाचलं का?

अशोक गहलोत गटातील आमदारांची बैठक

राजस्थानमध्ये गहलोत गटाचे 20 आमदार नगरविकास मंत्री शांती धारीवाल यांच्या घरी बैठक घेत आहेत. गहलोत गट शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. मात्र, गहलोत यांच्या अनेक समर्थकांनी बैठकीला येण्यास नकार दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, अशोक गहलोत गटाची बंडखोर वृत्तीही दिसून आली आहे.

अजय माकन म्हणाले ‘सध्या काहीच सांगू शकत नाही’

जयपूरमध्ये होणाऱ्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीबाबत अजय माकन म्हणाले, ‘ही बैठक सायंकाळी 7 वाजता होणार आहे. मी आत्ता काहीच सांगू शकत नाही. संध्याकाळच्या बैठकीनंतर चित्र स्पष्ट होईल. सोनिया गांधी यांनी मला आणि मल्लिकार्जुन खर्गे यांना आमदारांशी बोलणी करायला पाठवले आहे. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना माहिती देण्यात येईल.

ADVERTISEMENT

सचिन पायलट यांचे नाव आघाडीवर

मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारांमध्ये सचिन पायलट यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, याशिवाय अनेक नावांची चर्चा सुरू आहे. अनेक आमदार सचिन पायलट यांना सतत भेटत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून ते सातत्याने आमदारांच्या बैठका घेत आहेत. राजकीय वर्तुळात या बैठका अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. मात्र, पायलट आणि गहलोत यांच्यातील वाद कुणापासून लपून राहिलेला नाही. दोन्ही नेते उघडपणे एकमेकांवर पलटवार करताना दिसले आहेत. गहलोत गटाचे आमदार पायलट यांच्या नावावर तयार नसल्याचे बोलले जात आहे.

ADVERTISEMENT

अशोक गहलोत गटाच्या आमदारांची मागणी काय आहे?

अशोक गहलोत यांच्या गटातील आमदार आणि मंत्र्यांनी त्यांना दोन्ही पदांवर कायम ठेवण्याचा सल्ला देत आहेत. आपत्ती व्यवस्थापन आणि मदत मंत्री गोविंद राम मेघवाल म्हणाले की, राज्यात वर्षभरात निवडणुका घ्यायच्या असतील तर हायकमांडने गहलोत यांना दोन्ही पदावर ठेवल्यास ते आमच्यासाठी अधिक आनंददायी असेल. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रताप सिंह खाचरियावास म्हणाले की, राज्यात नेतृत्व बदलाची गरज नाही. यासाठी आम्ही सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आवाहन करणार आहोत की, राजस्थानच्या नेतृत्वाला बदल नको आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT