जळगाव : पोस्टाने कारणे दाखवा नोटीस मिळालेल्या ST कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
राज्यात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. कामावर न परतणाऱ्या कर्मचाऱ्यांना एसटी व्यवस्थापन कारणे दाखवा नोटीस बजावत बडतर्फीची कारवाई करत आहे. जळगावमध्ये अशाच पद्धतीने नोटीस बजावण्यात आलेल्या एका एसटी कर्मचाऱ्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील चोपडा आगारात एसटी वाहक राजेंद्र वाणी कार्यरत होते. संपात सहभागी झालेल्या वाणी यांना एसटी […]
ADVERTISEMENT
राज्यात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. कामावर न परतणाऱ्या कर्मचाऱ्यांना एसटी व्यवस्थापन कारणे दाखवा नोटीस बजावत बडतर्फीची कारवाई करत आहे. जळगावमध्ये अशाच पद्धतीने नोटीस बजावण्यात आलेल्या एका एसटी कर्मचाऱ्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील चोपडा आगारात एसटी वाहक राजेंद्र वाणी कार्यरत होते. संपात सहभागी झालेल्या वाणी यांना एसटी प्रशासनाने कामावर रुजु होण्यासंदर्भात कारणे दाखवा नोटीस बजावली. ही नोटीस वाचल्यानंतर वाणी यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेत असताना वाणी यांचा वाटेतच मृत्यू झाला.
स्वेच्छा मरणाची परवानगी द्या, मालवणात एसटी कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
हे वाचलं का?
वाणी यांच्या निधनानंतर चोपडा आगारातील संतप्त कर्मचाऱ्यांनी वाणी यांच्या मुलाला अनुकंपा तत्वावर नोकरी द्यावी यासाठी आगारप्रमुखांना घेराव घातला. मृत वाणी यांचा मृतदेह आगारात आणण्याचा इशारा दिल्यानंतर आगारप्रमुखांनी विभाग यंत्रणेशी संपर्क साधून वाणी यांच्या मुलाला नोकरी देण्याचं लेखी आश्वासन दिलं. या आश्वासनानंतर वाणी यांचे नातेवाईक व सहकारी शांत झाले. यानंतर त्यांच्यावर चर्हाडी या मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT