एनआयए कोठडीत अपमान आणि छळ, बळजबरीने कागदपत्रांवर घेतल्या सह्या; सचिन वाझेचा चांदिवाल आयोगासमोर दावा
चांदिवाल आयोगासमोर समोर आज अनिल देशमुख यांच्या वकिलांकडून सचिन वाझेची उलटतपासणी करण्यात आली. यावेळी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने एनआयएवर आरोप केले आहेत. 13 मार्च ला मला एनआयने अटक केली. त्यावेळी माझ्यावर दबाव टाकण्यात आला. माझ्याकडून जबरदस्तीने कोऱ्या कागदांवर सह्या करून घेण्यात आल्या. तसंच मला सतत हिणवलं जातं आणि अपमान केला जातो असंही सचिन वाझेने […]
ADVERTISEMENT

चांदिवाल आयोगासमोर समोर आज अनिल देशमुख यांच्या वकिलांकडून सचिन वाझेची उलटतपासणी करण्यात आली. यावेळी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने एनआयएवर आरोप केले आहेत. 13 मार्च ला मला एनआयने अटक केली. त्यावेळी माझ्यावर दबाव टाकण्यात आला. माझ्याकडून जबरदस्तीने कोऱ्या कागदांवर सह्या करून घेण्यात आल्या. तसंच मला सतत हिणवलं जातं आणि अपमान केला जातो असंही सचिन वाझेने चांदिवाल आयोगाला सांगितलं.
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या निवासस्थानासमोर असलेल्या स्कॉर्पियो कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी सचिन वाझेला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी चांदिवाल आयोगाकडूनही चौकशी सुरू आहे. आज या आयोगापुढे आपल्याला सातत्याने मानसिक त्रास दिला जात असल्याचा आणि बळजबरीने कोऱ्या कागदांवर सह्या घेतल्याचा दावा सचिन वाझेने केला आहे.
काय घडलं आयोगासमोर?
अनिल देशमुख यांच्या वकील अनिता कॅस्टेलिना यांनी सचिन वाझेला विचारलं की, तुम्ही एनआयए कोठडीत असताना तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा अस्वस्थ करणारी परिस्थिती होती का? यावर सचिन वाझे म्हणाला की, होय तो माझ्या आयुष्यातला सर्वात कठीण काळ होता. मी मानसिक तणावात होतो आणि माझ्यावर रोज दबाव टाकला जात होता. एवढंच नाही तर माझ्याकडून कोऱ्या कागदांवर बळजबरीने सह्या करून घेण्यात आल्या आहेत. या काळातही तुमच्याकडून जबाब नोंदवले जात होते का? असा प्रश्न पुन्हा एकदा विचारण्यात आला. ज्यावर NIA कडून माझा मानसिक छळ, अपमान एवढंच झाला. मी अजूनही त्या धक्क्यातून सावरलेलो नाही.
अनिता कॅस्टेलिनो यांनी यानंतर पुढे विचारल की, ‘तुमच्या प्रतिज्ञापत्रातील विधानाशिवाय, तुमच्याकडे कागदपत्राच्या आधारे समर्थन करण्यासाठी काहीही नाही?’ यावर वाझे यांनी उत्तर दिले, “मी एनआयएच्या ताब्यात असताना, मला अनेक कागदपत्रांवर जबरदस्तीने स्वाक्षरी करण्यास भाग पाडले गेले, जे मला दिले गेले नाहीत. 3 मे रोजी मी विशेष एनआयए न्यायालयाला ती कागदपत्रे देण्याची विनंतीही केली होती.”
टिप्सी बारची रेड, मनसुख हिरेन आणि सचिन वाझे, जाणून घ्या काय आहे कनेक्शन?
कॅस्टॅलिनो यांनी आयोगासमोर वाझेची उलटतपासणी घेण्यासाठी दोन आठवडे मागितले होते. ही कारवाई लांबल्याने नाराज झालेल्या आयोगाने देशमुख यांना 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला.
सोमवारी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त वाझे आणि परमबीर सिंग यांच्या भेटीत झालेल्या सर्व प्रकरणामुळे निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांनी तुरुंगातून आणलेल्या व्यक्तींच्या पोलीस पथकाला फटकारले. न्यायमूर्ती चांदीवाल म्हणाले, न्यायालयाच्या बाहेर जे काही घडेल, त्याला तुम्ही जबाबदार असाल. मात्र, थोड्या वेळाने वाझे आणि देशमुख एकमेकांना भेटले आणि बोलले. देशमुख आणि त्यांचे माजी स्वीय सचिव संजीव पालांडे जे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत त्याबाबत न्या. चांदीवाल यांनी पोलीस पथकाला खडे बोल सुनावले.
सचिन वाझे भर आयोगासमोर अनिल देशमुख यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करु लागला. यावेळी आयोगाकडून त्याला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच आपण असं करु नका, आयोगाने वाझेला हात जोडून सांगितले. माझ्या चांगुलपणाचा फायदा घेऊ नका, असं आयोगाकडून सचिन वाझेला रोखठोक सांगण्यात आलं. त्यानंतर सचिन वाझे गप्प बसला.
चांदिवाल आयोगासमोर अनिल देशमुखांच्या वकील अनिता यांनी सचिन वाझेची उलट तपासणी केली. यावेळी दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली ते पुढीलप्रमाणे-
प्रश्न 1 : वकील अनिता : 13 मार्च 2020 तुम्हाला अटक झाली होती का?
उत्तर : सचिन वाझे : हो
प्रश्न 2 : NIA च्या कस्टडीत असताना तुमच्यावर दबाव होता का?
उत्तर : हो, ती वेळ माझ्या आयुष्यातील सर्वात जास्त कठीण वेळ होती.
प्रश्न 3 : या तणावादरम्यान तुम्ही दबावात होता का? या दरम्यान तुमची अनेक केंद्रीय यंत्रणांनी चौकशी केली का?
वाझे : मी 28 दिवस NIA कोठडीत होतो. तेव्हा ट्रॉमामध्ये होतोच पण त्या ठिकाणी माझा NIA ने छळ केला. मी आजही ट्रॉमामध्ये आहे
( वाझे पाणी प्यायला )
प्रश्न 4 : तुम्ही प्रतिज्ञापत्रात दिलेला जबाब या व्यतिरिक्त तुमच्याकडे काहीच पुरावे नाहीत का?
उत्तर : 3 मे 2021 या दिवशी मी NIA ला विनंती केली होती की मला प्रकरणासंबंधी कागदपत्रे द्यावीत ज्यात पंचनामा FIR विविध कागदपत्रे होते. पण माझ्याकडून जबरदस्तीने अनेक कागदपत्रांवर सह्या घेतल्या गेल्या.
प्रश्न 5 : त्या दरम्यान आपण तणावातून गेला होतात?
वाझे : ( उत्तर दिले नाही )
फेब्रुवारी 2021 च्या अँटिलिया बॉम्ब आणि व्यापारी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणानंतर वाझे हे एनआयएच्या कोठडीत होते. सचिन वाझेचा जबाब ईडीने देशमुख यांच्या विरोधात न्यायालयीन कोठडीत नोंदवले होते आणि नंतर देशमुख यांना या महिन्याच्या सुरुवातीला ईडीने अटक केली होती.