NCP: ”माझ्या बापाचा नाद करायचा नाही”, सुप्रिया सुळेंनी अजित दादांना दिले थेट चॅलेंज

मुंबई तक

ADVERTISEMENT

supriya sule direct challenge ajit pawar sharad pawar ncp crisis maharashtra politics
supriya sule direct challenge ajit pawar sharad pawar ncp crisis maharashtra politics
social share
google news

Maharashtra Political Latest News : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवारांनी (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फुट पडली आहे. यामुळे आता अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. असे असतानाच आता राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर थेट हल्लाबोल केला आहे. ”बाकी कोणाबद्दलही बोला, पण, माझ्या बापाचा नाद करायचा नाही, असे थेट चॅलेंजत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी थेट अजितदादांना दिले आहे. (supriya sule direct challenge ajit pawar sharad pawar ncp crisis maharashtra politics

‘बाकी कुणाबद्दलही बोला’, आमच्यावर काही करायचे ते करा, ‘पण माझ्य़ा बापाच्या आणि आईच्या बाबतीत नाद करायचा नाही’, असे आव्हानच सुप्रिया सुळे यांनी दिले आहे. तसेच हा बाप माझ्या एकटीचा नाही आहे तो माझ्यापेक्षा तुमचा जास्त आहे, असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

आपली लढाई ही एका व्यक्तीच्या विरोधाच नाही, तर या भारतीय जनता पक्षाच्या प्रवृत्तीच्या विरोधात असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. याचसोबत सुप्रिया सुळे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही हल्ला चढवला आहे. ”नेशनलीस्ट कॉग्रेस पार्टीला काय म्हणायचे, नॅचरली करप्ट पार्टी”. ”ना खाऊंगा, ना खाने दुंगा”, लेकीन जब मुझे जरूरूत पडेगी, तब वही नॅचरली करप्ट पार्टी का, पुरा खा जाऊंगा, असा टोलाच सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदी यांना लगावला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : NCP: अजितदादांना ठणकावलं; शरद पवारांचं ‘ते’ भाषण जसंच्या तसं!

तसेच हे म्हणतात ”ना खाऊंगा, ना खाणे दाऊंगा”. ”अब दिखाऊंगी कैसे तुमणे खाया है”. आज के बाद तुमको महाराष्ट्र मे खाने नही दुंगी, भाजपच्या खोटारडे पणासाठी आजपासून लढायचं, असे थेट आव्हानच सुळे यांनी पंतप्रधान मोदी यांना दिले. यांचा दिल्लीत जो कार्यक्रम करायचा आहे तो मी, अमोल दादा आणि फैजल करू, असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.सुप्रिया सुळेंनी यावेळी शरद पवार एक विनंती देखील केली. नवीन उमेदीने आज पक्ष सुरु होणार आहे. 33 टक्के आऱक्षण महिलांना तु्म्ही का देत नाही. आम्ही पन्नास टक्के मागत नाही,असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

अरे पक्ष पुन्हा बांधु, जे आमदार गेले आहेत त्यांना शुभेच्छा. 8-9 खुर्च्या रिकाम्या झाल्या आहेत.या खुर्चावर नवीन लोकांना संधी देऊ. तसेच बाकीचे काय करतील हे माहित नाही, पण महाराष्ट्राची जनता याच यौद्ध्यामागे उभी राहील.अनेकदा महाराष्ट्राने हे दाखवलं आहे आणि पुन्हा आपल्याला तेच करायचं आहे, असा विश्वास देखील सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांमध्ये भरला आहे. तसेच ओरीजनल राष्ट्रवादीचा झेंडा आणि चिन्ह हे ओरीजनल राष्ट्रवादीकडेच राहिल,असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : NCP: अजित पवारांची मोठी खेळी! थेट राष्ट्रीय अध्यक्ष पदावर सांगितला दावा

    follow whatsapp

    ADVERTISEMENT