‘ही शक्यता नाकारता येणार नाही’; संजय राऊतांच्या ईडी चौकशीवर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

मुंबई तक

मुंबईतील गोरेगाव येथील पत्रा चाळ प्रकरणी संजय राऊत पुन्हा एकदा ईडीच्या रडावर आले आहेत. दोन वेळा समन्स बजावल्यानंतर चौकशीला उपस्थित न राहिलेल्या संजय राऊतांच्या घरी सकाळीच ईडीचं पथक दाखल झालं. ईडीकडून सुरू असलेल्या संजय राऊतांच्या चौकशीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी भूमिका मांडली. सुप्रिया सुळे म्हणाल्या, “संजय राऊतांच्या घरी रेड झालेली आहे. मध्यंतरी त्यांना समन्स […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

मुंबईतील गोरेगाव येथील पत्रा चाळ प्रकरणी संजय राऊत पुन्हा एकदा ईडीच्या रडावर आले आहेत. दोन वेळा समन्स बजावल्यानंतर चौकशीला उपस्थित न राहिलेल्या संजय राऊतांच्या घरी सकाळीच ईडीचं पथक दाखल झालं. ईडीकडून सुरू असलेल्या संजय राऊतांच्या चौकशीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी भूमिका मांडली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “संजय राऊतांच्या घरी रेड झालेली आहे. मध्यंतरी त्यांना समन्स आलेलं होतं. मला विश्वास आहे की, कुठलीही एजन्सी जेव्हा आपल्याकडे येते, तेव्हा त्यांना सहकार्य करणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. संजय राऊत त्यांना सहकार्य करतील.”

राहुल गांधी, सोनिया गांधींचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘संजय राऊत सहकार्य करतील’

ईडीच्या माध्यमातून विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न होतोय का? असा आरोप विरोधकांकडून सातत्यानं होतोय. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “याबाबतची आकडेवारीच हेच सांगतेय. सातत्याने आम्हाला हे जाणवतंय. हे होत आहे. आम्ही काँग्रेस पक्षासोबत उभे राहिलो. यासदंर्भात आम्ही संसदेत निदर्शनं करू कारण देशातील सर्वोच्च ठिकाण आहे. राहुल गांधी, सोनिया गांधी यांना अनेकवेळा बोलावण्यात आलं. त्यांनी सहकार्य केलं. मला पूर्ण विश्वास आहे की, एजन्सीला जसं सहकार्य गांधी कुटुंबाने केलं, तसंच संजय राऊत करतील,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

संजय राऊत यांच्यामागे ज्यामुळे ईडीचा फेरा लागला, ते पत्रा चाळ प्रकरण काय?