Sushma Andhare : संजय राऊत तुरुंगातून परतल्याने शिवसेनेची ताकद दहापटीने वाढली आहे
शिवसेनेच्या आक्रमक नेत्या सुषमा अंधारे यांनी आज शिवसेना खासदार संजय राऊत यांची त्यांच्या भांडूप येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. संजय राऊत हे गुरूतुल्य व्यक्तीमत्व आहेत असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. तसंच संजय राऊत हे तुरुंगातून सुटून आल्याने शिवसेनेची ताकद दसपटीने वाढली आहे असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. सुषमा अंधारे यांनी व्यक्त केल्या भावना […]
ADVERTISEMENT
शिवसेनेच्या आक्रमक नेत्या सुषमा अंधारे यांनी आज शिवसेना खासदार संजय राऊत यांची त्यांच्या भांडूप येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. संजय राऊत हे गुरूतुल्य व्यक्तीमत्व आहेत असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. तसंच संजय राऊत हे तुरुंगातून सुटून आल्याने शिवसेनेची ताकद दसपटीने वाढली आहे असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
सुषमा अंधारे यांनी व्यक्त केल्या भावना
संजय राऊत हे आमच्या पक्षातले ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना भेटण्याची उत्सुकता फार होती.बऱ्याच दिवसानंतर मनमोकळ्या गप्पा झाल्या तब्बल 102 दिवस मला पक्षात येऊन झालेत आणि तब्बल 102 दिवसांनी सन्माननीय राऊत साहेब हे आमच्या सगळ्यांना भेटीसाठी उपलब्ध झालेत हा एक योगायोगच म्हणावा परंतु एक नक्की राऊत साहेबांच्या येण्याने खूप ताण कमी झाल्यासारखा वाटत आहे थोडेसे हलके वाटत आहे आणि सोबतच शिवसेनेची ताकद दहा पटीने वाढली आहे.
राऊत साहेबांना म्हटलं , सर आम्ही खारीचा वाटा उचलायचा प्रयत्न केला आमच्या आमच्या परीने खिंड लढवली फार मोठे काही नाही केलं रावसाहेब उत्तरले हे तुम्ही निकराने लढलात ही खिंड देखील म्हणजेच ती पावनखिंड झाली.. माझ्या सारख्या एका छोट्या शिवसैनिकांसाठी ही फार मोठी पोच आहे असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
हे वाचलं का?
लांब पल्ल्याची तोफ असं संजय राऊत यांचं वर्णन उद्धव ठाकरेंनी केलं. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं. विरोधकांवर टीका करताना काय केलं पाहिजे हे मी समजून घेतलं. संजय राऊत परत आल्यानंतर शिवसेनेची उमेद वाढली आहे. ईडीने जी सुडबुद्धीने कारवाई केली त्यावर न्यायालयाने ताशेरे ओढलेच. ईडीची खरंच गरज आहे का? यावर चर्चा होण्याची गरज आहे असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
जे लोक संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नात आलेल्या मेहंदीवाल्याचा आणि गजरेवाल्याचा हिशोब मागतात ते लोक दसरा मेळावा जो बीकेसीमध्ये पार पडला तिथे जे कोट्यवधी खर्च केले गेले त्याचा हिशोब कधी मागणार आहे? मी किरीट सोमय्यांना वारंवार म्हणते की मी तुमचं शिष्यत्व पत्करायला तयार आहे पण अनिल परब यांच्या बंगल्यावर हातोडा घेऊन जात आहात तसा नारायण राणेंच्या बंगल्यावर हातोडा घेऊन कधी जाणार? बीकेसीतल्या मेळाव्यावर किती खर्च झाला? त्यावर किरीट सोमय्या का बोलत नाहीत? या प्रश्नांची उत्तरं दिली तर मी शिष्य व्हायला तयार आहे असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. या प्रश्नांची उत्तरं त्यांना द्यावी लागतील असंही त्या म्हणाल्या.
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीस यांनाही प्रश्न
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद, गृहमंत्रीपद, इतर खाती हे सगळं सांभाळत असताना देवेंद्र फडणवीस यांची दमछाक होते आहे. त्यांनी गृह खातं दुसऱ्या कुणाला तरी सोपवलं पाहिजे. सुप्रिया सुळेंचा अपमान केला जातो, संभाजी भिडे महिला पत्रकाराचा अपमान करतात तरीही गृहमंत्री काहीच बोलत नाहीत मग हे खातं त्यांना झेपतं आहे का? असाही प्रश्न सुषमा अंधारे यांनी विचारला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT