काँग्रेसला आणखी एक धक्का! महिला काँग्रेसच्या प्रमुख नेत्याचा राजीनामा
अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आणि माजी खासदार सुश्मिता देव यांनी आपल्या पदासह काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. देव यांनी ट्विट बायो बदलल्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडल्याचं वृत्त समोर आलं होतं. काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्या नेत्यांची मालिका सुरूच असून, जितीन प्रसाद आणि मणिपूरमधील काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गोविंददास कोंथउजम यांच्यानंतर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. अखिल […]
ADVERTISEMENT

अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आणि माजी खासदार सुश्मिता देव यांनी आपल्या पदासह काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. देव यांनी ट्विट बायो बदलल्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडल्याचं वृत्त समोर आलं होतं.
काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्या नेत्यांची मालिका सुरूच असून, जितीन प्रसाद आणि मणिपूरमधील काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गोविंददास कोंथउजम यांच्यानंतर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुश्मिता देव यांनी काँग्रेस सोडली असून, सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.
माजी खासदार सुश्मिता देव यांनी ट्विट बायोमध्ये बदल केला. अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा असा बदल करण्यात आल्यानंतर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या.
याची चर्चा सुरू असतानाच सुश्मिता देव यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त समोर आलं. माजी खासदार सुश्मिता देव यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा सादर केला.









