फ्लोअर टेस्टवर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष; महाराष्ट्राच्या लढ्यात पुढे काय?
महाराष्ट्राची राजकीय लढाई आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारला फ्लोअर टेस्टची नोटीस दिल्यानंतर शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे, अशा स्थितीत उद्धव ठाकरे यांचे सरकार बुधवारी महाराष्ट्र विधानसभेत फ्लोअर टेस्टला सामोरे जाणार की नाही याबाबत सर्वोच्च न्यायालय आज सायंकाळी पाच वाजता सुनावणी होणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्राची राजकीय लढाई आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारला फ्लोअर टेस्टची नोटीस दिल्यानंतर शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे, अशा स्थितीत उद्धव ठाकरे यांचे सरकार बुधवारी महाराष्ट्र विधानसभेत फ्लोअर टेस्टला सामोरे जाणार की नाही याबाबत सर्वोच्च न्यायालय आज सायंकाळी पाच वाजता सुनावणी होणार आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मोठा निर्णय घेतला आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सरकारला नोटीस बजावून 30 जून रोजी सायंकाळी 5 वाजता बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. फ्लोअर टेस्टसाठी विधानसभेचे विशेष अधिवेशनही बोलावण्यात आले आहे. फ्लोअर टेस्टच्या संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओग्राफी करण्यात येणार असून त्याचा अहवाल पाठवण्यास सांगितले आहे. फ्लोअर टेस्ट कोणत्याही परिस्थितीत पुढे ढकलण्यात येऊ नये, असे सांगण्यात आले आहे. विधानसभा परिसरात सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याच्या सूचनाही राज्यपालांनी दिल्या आहेत.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला नोटीस दिल्यानंतर काही तासांतच शिवसेनेने फ्लोअर टेस्टच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) दरवाजा ठोठावला आहे. शिवसेना (Shivsena) नेते सुनील प्रभू यांनीही राज्यपालांच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून फ्लोअर टेस्ट थांबवण्याची विनंती केली आहे. 16 बंडखोर आमदारांच्या अपात्रतेची प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. अशा स्थितीत जोपर्यंत या प्रकरणी निर्णय होत नाही तोपर्यंत फ्लोअर टेस्ट घेता येणार नाही. सुप्रीम कोर्टानेही बुधवारी शिवसेनेच्या अर्जावर सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे.
महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारच्या फ्लोअर टेस्टची तारीख उद्याची आहे. अशा स्थितीत शिवसेनेच्या अर्जावर सर्वोच्च न्यायालय आजच निर्णय देऊ शकते की फ्लोर टेस्ट होणार की नाही. त्याचवेळी, कर्नाटक आणि मध्य प्रदेशसह सर्वोच्च न्यायालयाच्या जुन्या निर्णयांवर नजर टाकली, तर सर्वोच्च न्यायालयाने कधीही फ्लोअर टेस्टला स्थगिती दिलेली नाही अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्राच्या बाबतीत काय निर्णय देते हे पाहावे लागेल.









