नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद्याचा संशयास्पद मृत्यू, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

योगेश पांडे, नागपूर: नागपूर मध्यवर्ती कारागृहात (Nagpur Central Jail) एका 28 वर्षीय तरुण कैद्याचा अचानक मृत्यू झाल्याने एकच खळबळ माजली आहे. पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप यावेळी नातेवाइकांनी केला आहे. नागपुरातील नंदनवन परिसरातील श्रीनगर येथे राहणारा आकाश ताराचंद घोड हा 28 वर्षीय युवक हत्येच्या आरोपाखाली नागपूर मध्यवर्ती कारागृहाच्या कोठडीमध्ये कैद होता. कैदेत असतानाच त्याचा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

योगेश पांडे, नागपूर: नागपूर मध्यवर्ती कारागृहात (Nagpur Central Jail) एका 28 वर्षीय तरुण कैद्याचा अचानक मृत्यू झाल्याने एकच खळबळ माजली आहे. पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप यावेळी नातेवाइकांनी केला आहे. नागपुरातील नंदनवन परिसरातील श्रीनगर येथे राहणारा आकाश ताराचंद घोड हा 28 वर्षीय युवक हत्येच्या आरोपाखाली नागपूर मध्यवर्ती कारागृहाच्या कोठडीमध्ये कैद होता. कैदेत असतानाच त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आल्याने आता या प्रकरणी अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. तर दुसरीकडे पोलिसांच्या मारहाणीत आकाशचा मृत्यू झाला असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.

नेमकं घडलं तरी काय?

शनिवारी संध्याकाळच्या सुमारास आकाशची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु काही वेळाने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

यानंतर पोलिसांनी आकाशच्या मृत्यूची संपूर्ण माहिती त्याच्या कुटुंबीयांना तात्काळ दिली. त्यानंतर नातेवाईकांनी नागपुरातील मेडिकल कॉलेजमध्ये एकच गर्दी केली.

यावेळी कैदी आकाशच्या नातेवाईकांनी असा आरोप केला की, त्याला कारागृहात पोलिसांकडून बेदम मारहाण झाली आणि याच मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, आकाशच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून त्याच्या शवविच्छेदनाची व्हिडिओग्राफी करण्यात आली आहे. जेणेकरुन शवविच्छेदनादरम्यान मृतदेहासोबत कोणतीही छेडछाड होणार नाही.

आकाशचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप समोर आलेलं नाही. यासाठी आता पोलिसांना देखील शवविच्छेदनाच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. या अहवालानंतरच त्याचा मृत्यू कसा झाला हे समोर येणार आहे.

दरम्यान, या सगळ्यातील धक्कादायक बाब म्हणजे मागील दोन महिन्यातील कारागृहातील हा तिसरा मृत्यू आहे. त्यामुळे आता पोलिसांमध्ये देखील एकच खळबळ माजली असून आता हा सगळा प्रकार उजेडात आणवा अशी कैद्याच्या नातेवाईकांची मागणी आहे.

कल्याण: आधी पंढरपूर नंतर आधरवाडी… जेलमधून पसार झालेला भामटा ‘असा’ सापडला पोलिसांच्या जाळ्यात

नागपूर मध्यवर्ती कारागृहमध्ये एका तरुण कैद्याचा अचानक मृत्यू झाल्याने जेल प्रशासन देखील चिंतेत पडलं आहे. कारण आता या सगळ्या प्रकरणाची आता सविस्तर चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या मृत्यू प्रकरणामुळे नागपूर मध्यवर्ती कारागृहातील प्रशासनावर देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात राज्याचं गृहविभाग लक्ष घालणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp