कोल्हापूर : ऊस परिषदेतून राजू शेट्टींचा एल्गार; FRP अधिक 350 रुपये प्रतिटनाची मागणी
कोल्हापुर : चालू गळीत हंगामासाठी संपूर्ण एकरकमी एफआरपीसह अधिक 350 रूपये प्रतिटन पहिली उचल मिळाल्याशिवाय ऊसाच्या काड्यालाही हात लावून देणार नाही असा इशारा स्वाभिमनी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 21 वी ऊस परिषद आज (शनिवारी) जयसिंगपूर इथल्या विकमसिंह मैदानावर पार पडली. या […]
ADVERTISEMENT

कोल्हापुर : चालू गळीत हंगामासाठी संपूर्ण एकरकमी एफआरपीसह अधिक 350 रूपये प्रतिटन पहिली उचल मिळाल्याशिवाय ऊसाच्या काड्यालाही हात लावून देणार नाही असा इशारा स्वाभिमनी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 21 वी ऊस परिषद आज (शनिवारी) जयसिंगपूर इथल्या विकमसिंह मैदानावर पार पडली. या परिषदेत शेट्टी बोलत होते. गेल्या 3 वर्षांपासून महापूर, कोरोना, अवकाळी पाऊस यामुळे झालेले नुकसान बघता चालू हंगामातील दराबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता लागली होती.
यावेळी बोलताना त्यांनी गत हंगामातील एफ.आर.पी अधिक दोनशे रुपये आणि साखर कारखानदारांकडून होणारी काटामारी यावरही आक्रमक भूमिका मांडली. तसंच या विरोधात 7 नोव्हेंबर रोजी पुणे साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही शेट्टी यांनी दिला.
दरम्यान, ऊस परिषदेत राजू शेट्टी यांनी एकूण 13 ठरावांचे वाचन केले आणि ते सर्वानुमते मंजूर करण्यात आले.