मुंबईच्या रस्त्यावर भर दिवसा ‘बर्निंग टॅक्सीचा’ थरार
मुंबईतल्या रस्त्यावर आज भल्या पहाटे बर्निंग टॅक्सीचा थरार पहायला मिळाला. प्रतीक्षा नगर, सायन भागात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका टॅक्सीने अचानक पेट घेतला. यामुळे आजुबाजूला उभ्या असलेल्या टॅक्सीचालकांचीही चांगलीच तारांबळ उडाली सकाळची वेळ असल्यामुळे रस्त्यावर रहदारी कमी होती, ज्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. अखेरीस […]
ADVERTISEMENT

मुंबईतल्या रस्त्यावर आज भल्या पहाटे बर्निंग टॅक्सीचा थरार पहायला मिळाला.
प्रतीक्षा नगर, सायन भागात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका टॅक्सीने अचानक पेट घेतला. यामुळे आजुबाजूला उभ्या असलेल्या टॅक्सीचालकांचीही चांगलीच तारांबळ उडाली
सकाळची वेळ असल्यामुळे रस्त्यावर रहदारी कमी होती, ज्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
अखेरीस अग्नीशमन दलाने घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.