पुण्यात भीषण परिस्थिती, पाहा गेल्या 24 तासात किती नवे कोरोना रुग्ण सापडले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे: Pune Corona Situation: पुणे जिल्ह्यात सध्या कोरोनाची परिस्थिती अत्यंत भयंकर आहे. मुंबईपेक्षाही सर्वाधिक कोरोना (Corona) रुग्ण हे पुण्यात आढळून येत आहेत. एवढंच नव्हे तर राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण (Active Cases) देखील हे पुणे (Pune) जिल्ह्यातच आहे. त्यामुळे पुणेकरांची चिंता खूपच वाढली आहे.

ADVERTISEMENT

गेल्या 24 तासात एकट्या पुणे जिल्ह्यात 7907 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 4631 हे फक्त पुणे शहरातील रुग्ण आहेत. नवे रुग्ण ज्या वेगाने सापडत आहेत त्या तुलनेत पुण्यात रुग्ण बरे होण्याचा वेग काहीसा कमी आहे. काल 4759 रुग्ण हे बरे होऊन घरी परतले आहेत.

दरम्यान, पुण्यात काल एक दिवसात 62 रुग्ण दगावले आहेत. ज्यापैकी 47 रुग्ण हे एकट्या पुणे शहरातील होते. तर उर्वरित 15 रुग्ण हे जिल्ह्यातील इतर भागातील आहेत. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 9020 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

हे वाचलं का?

‘कोरोना व्हायरस आपल्या सहनशीलतेची परीक्षा पाहतोय एकत्र लढूयात’, ‘मन की बात’मधून मोदींचं जनतेला आवाहन

पुणेकरांसाठी आणि पुणे प्रशासनाच्या दृष्टीने सर्वात चिंतेची बाब म्हणजे येथील अॅक्टिव्ह रुग्ण संख्या. सध्या पुण्यात 107503 एवढे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रातील पुणे हा एकमेव जिल्हा आहे की ज्याची अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ही एक लाखाच्या पुढे आहे. त्यामुळे येथील आरोग्य सेवेवर प्रचंड ताण आला असून सध्या अनेकांना बेड देखील उपलब्ध होत नाहीए. त्यामुळे पुण्यात कोरोना रुग्णांची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचं दिसून येत आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात किती नवे रुग्ण सापडले?

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या 24 तासात कोरोनाचे (Corona Paitents) पुन्हा एकदा मोठ्या संख्येने रुग्ण सापडेल आहेत. मागील काही दिवसांपासून दररोज 65 हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत. राज्यात सध्या लॉकडाऊन लागू असून देखील गेल्या 24 तासात तब्बल 66,191 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील आरोग्य सेवेवरील ताण हा सतत वाढत आहे.

याशिवाय आणखी धक्कादायक गोष्ट म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृतांचा आकडा (Deaths) बराच वाढला आहे. कारण मागील 24 तासात राज्यात एकूण 832 कोरोना रुग्ण दगावले आहेत. राज्यात सध्या 6 लाख 98 हजार 354 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Corona Treatment: 90 टक्के कोरोना रुग्ण ‘ही’ गोष्ट करुन घरीच होतील बरे, दिग्गज डॉक्टरांनी दिली माहिती

मुंबईत दिवसभरात 5 हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह

मुंबईत दिवसभरात 5 हजार 542 कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 64 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 8 हजार 478 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण 5 लाख 37 हजार 711 रूग्ण बरे झाले आहेत. मुंबईतील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 86 टक्के आहे. डबलिंग रेट 58 दिवसांवर गेला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT