Russia: पर्म विद्यापीठात अंदाधुद गोळीबार, 8 विद्यार्थी ठार; 14 जखमी

मुंबई तक

पर्म (रशिया): रशियातील पर्म स्टेट विद्यापीठात (Perm State University) एका तरुणाने केलेल्या गोळीबारात (Russian University Shooting) तब्बल 8 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने रशियात एकच खळबळ माजली आहे. अचानक झालेल्या या गोळीबाराने संपूर्ण विद्यापीठ परिसरात एकच गोंधळ उडाला होता. यावेळी अनेक विद्यार्थी हे जीव मुठीत घेऊन धावत होते. स्थानिक मीडियाच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

पर्म (रशिया): रशियातील पर्म स्टेट विद्यापीठात (Perm State University) एका तरुणाने केलेल्या गोळीबारात (Russian University Shooting) तब्बल 8 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने रशियात एकच खळबळ माजली आहे. अचानक झालेल्या या गोळीबाराने संपूर्ण विद्यापीठ परिसरात एकच गोंधळ उडाला होता. यावेळी अनेक विद्यार्थी हे जीव मुठीत घेऊन धावत होते. स्थानिक मीडियाच्या रिपोर्टनुसार, सुरक्षारक्षकांनी नंतर हल्लेखोराला देखील ठार केलं.

दरम्यान, हल्ला झाल्याचं लक्षात येताच काही वर्गामधील अनेक विद्यार्थ्यांनी आपला जीव वाचविण्यासाठी थेट खिडक्यांमधून खाली उड्या मारल्या. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचे व्हीडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती बंदूक घेऊन सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये घुसला. विद्यापीठातील एका इमारतीत घुसल्यानंतर या व्यक्तीने अंदाधुंद गोळीबाराला सुरुवात केली.