ठाकरे सरकार आज ठरवणार विधानसभा अध्यक्ष निवडीची तारीख
मुंबई: काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन साधारण: 25 दिवस उलटून गेले आहेत. मात्र अद्यापही या पदी कुणाचीही निवड झालेली नाही. यावरुनच भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर वारंवार टीका केली जात आहे. मात्र, आता लवकरच विधानसभा अध्यक्षांची निवड होण्याची शक्यता आहे. कारण आज (28 फेब्रुवारी) होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची […]
ADVERTISEMENT

मुंबई: काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन साधारण: 25 दिवस उलटून गेले आहेत. मात्र अद्यापही या पदी कुणाचीही निवड झालेली नाही. यावरुनच भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर वारंवार टीका केली जात आहे. मात्र, आता लवकरच विधानसभा अध्यक्षांची निवड होण्याची शक्यता आहे. कारण आज (28 फेब्रुवारी) होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची नेमकी तारीख ठरवली जाणार आहे.
दरम्यान, विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीची तारीख ठरविण्याआधी मंत्रिमंडळात याविषयी देखील चर्चा होण्याची शक्यता आहे की, ही निवडणूक घेण्यासाठी राज्य सरकार योग्य स्थितीत आहे की नाही? आजच्या मंत्रिमंडळात हा विषय प्रामख्याने चर्चेला येणार असल्याने लवकरच विधानसभेला नवा अध्यक्ष मिळू शकतो.
दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वीच सरकारला पत्र पाठवून विधानसभा अध्यक्षाची निवडणूक कधी घेणार? अशी विचारणा केली होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानं नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे विधानसभा अध्यक्षपद रिकामं झालं आहे.
ही बातमी देखील पाहा: राज्यपाल-ठाकरे सरकार वादाचा नवा अंक, कोश्यारींच्या पत्राने ठिणगी?