देशातला सर्वात मोठा लफंगा आणि खंडणीखोर चोर म्हणजे किरीट सोमय्या-संजय राऊत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भाजप नेते किरीट सोमय्या हे कोर्लई गावाचा दौरा करत आहेत. रश्मी ठाकरेंचे 19 बंगले या ठिकाणी आहेत असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. त्या बंगल्यांचं नेमकं काय झालं ते पाहण्यासाठी ते या गावाचा दौरा करत आहेत. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांना उत्तर दिलं आहे. किरीट सोमय्यांची आता लोकच धिंड काढतील असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.किरीट सोमय्या म्हणजे देशातला सर्वात मोठा लफंगा, खंडणीखोर माणूस आहे, त्याच्यामागे तुम्ही लोक कशाला जाता? असा प्रश्न मीडियाला विचारत संजय राऊत यांनी किरीट सोमय्यावर टीकेचे बाण चालवले आहेत.

ADVERTISEMENT

‘जो मैं बोलता हूँ वो मै करता हूँ, जो नहीं बोलता वो….’ संजय राऊत यांचा फिल्मी अंदाज

काय म्हणाले आहेत संजय राऊत?

हे वाचलं का?

‘कोर्लई गावातल्या जमिनीवर एकही बंगला नाही, एकही बांधकाम नाही. वारंवार यासंदर्भातलं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. किरीट सोमय्यांना स्वप्नात बंगले दिसत आहेत. बहुदा काहीतरी भुताटकीचा प्रकार आहे. स्वतःच्याच बेनामी प्रॉपर्टी भाजपच्या लोकांना दिसत आहेत आणि ते दुसऱ्यांवर आरोप करत आहेत. त्या जागेचे मूळ मालक अन्वय नाईक यांना आत्महत्या का करावी लागली? यावर भाजपचे लोक गप्प का बसले आहेत? मात्र अन्वय नाईकला ज्याच्यामुळे आत्महत्या करावी लागली त्या गुन्हेगाराचं समर्थन भाजपचे लोक करत होते.’ असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

उद्धवजी फक्त जनतेला सांगा, मुख्यमंत्री असूनही माझ्या पत्नीचे बंगले चोरीला गेले-किरीट सोमय्या

ADVERTISEMENT

‘अर्णब गोस्वामीला भाजपने पाठिंबा दिला होता त्यामुळे भाजपच्या दबावाखाली येऊन अन्वय नाईक या मराठी माणसाने आत्महत्या केली. माझ्याकडे अशीही माहिती आहे की किरीट सोमय्यानेही अन्वय नाईकला धमक्या दिल्या होत्या. अर्णब गोस्वामीकडे पैसे मागायचे नाहीत, बिल पाठवायचं नाही अशा धमक्या सोमय्यांनी दिल्या होत्या अशीही माहिती आता माझ्याकडे आली आहे. भाजपच्या लोकांनी अन्वय नाईक यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं. महाराष्ट्रातून आणि मुंबईतून मराठी माणूस हटवायचा भाजपचा कट आहे. त्यामुळेच छोट्या मोठ्या उद्योजकांना धमक्या दिल्या जातात. त्यांच्यावर भाजपकडून दबाव आणला जातो. भाजपचे लोक अन्वय नाईकचे खुनी आहेत’ असाही आरोप संजय राऊत यांनी केला.

ADVERTISEMENT

किरीट सोमय्या म्हणजे देशातला सर्वात मोठा लफंगा, खंडणीखोर माणूस आहे, त्याच्यामागे तुम्ही लोक कशाला जाता? असा प्रश्न मीडियाला विचारत संजय राऊत यांनी किरीट सोमय्यावर टीकेचे बाण चालवले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT