मुख्यमंत्र्यांनी चित्रपट आणि टीव्ही मालिका निर्मात्यांशी साधला संवाद
महाराष्ट्रात कोरोना रूग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. बॉलिवूड तसंच मराठी कलाकार देखील कोरोनाच्या विळख्यात अडकलेत. दरम्यान याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोविडच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट आणि टिव्ही मालिका निर्माते यांच्याशी व्हिडीयो कॉलिंगद्वारे चर्चा केली. यामध्ये सरकार घेत असलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने सहकार्य करावं असं आवाहन केलं. दरम्यान निर्मात्यांनी देखील आपल्या विविध सूचना मांडून एकजुटीने […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात कोरोना रूग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. बॉलिवूड तसंच मराठी कलाकार देखील कोरोनाच्या विळख्यात अडकलेत. दरम्यान याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोविडच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट आणि टिव्ही मालिका निर्माते यांच्याशी व्हिडीयो कॉलिंगद्वारे चर्चा केली. यामध्ये सरकार घेत असलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने सहकार्य करावं असं आवाहन केलं.
दरम्यान निर्मात्यांनी देखील आपल्या विविध सूचना मांडून एकजुटीने सरकार घेईल त्या निर्णयांना पाठिंबा असेल असे निर्विवाद आश्वासन दिलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या बैठकीत महेश भट, सुषमा शिरोमणी, मेघराज राजेभोसले, मनोज जोशी, सुबोध भावे, डॉ अमोल कोल्हे, सिद्धार्थ रॉय कपूर, अमित बहेल, निखिल साने, दीपक राजाध्यक्ष, अजय भाळवणकर, टी पी अग्रवाल, सतीश राजवाडे, संग्राम शिर्के, अशोक दुबे, नितीन वैद्य, अशोक पंडित, अभिषेक रेगे, दीपक धर या सर्वांनी उपस्थिती लावली होती.
यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास आदी देखील सहभागी झाले होते.