LPG Cylinder Price : सामान्य माणसाच्या खिशाला कात्री, LPG सिलिंडर झाला महाग
LPG Gas सिलिंडरच्या दरात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी वाढ कऱण्यात आली आहे. घरगुती वापराचा विनाअनुदानित सिलिंडर 25 रूपयांनी तर व्यावसायिक वापराचा सिलिंडर 75 रूपयांनी महाग झाला आहे. मुंबईत घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचा दर आता 884 रुपये आहे आधी पूर्वी तो 859 रुपयांमध्ये विकला जात होता. चेन्नईमध्ये स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरसाठी तुम्हाला आजपासून 900.50 रुपये भरावे लागतील, […]
ADVERTISEMENT
LPG Gas सिलिंडरच्या दरात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी वाढ कऱण्यात आली आहे. घरगुती वापराचा विनाअनुदानित सिलिंडर 25 रूपयांनी तर व्यावसायिक वापराचा सिलिंडर 75 रूपयांनी महाग झाला आहे.
ADVERTISEMENT
मुंबईत घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचा दर आता 884 रुपये आहे आधी पूर्वी तो 859 रुपयांमध्ये विकला जात होता. चेन्नईमध्ये स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरसाठी तुम्हाला आजपासून 900.50 रुपये भरावे लागतील, कालपर्यंत 755.50 रुपये भरावे लागत होते. उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये एलपीजी सिलिंडरसाठी तुम्हाला 897.5 रुपये भरावे लागतील.
1 जानेवारी ते 1 सप्टेंबर दरम्यान स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत प्रत्येकी 190 रुपयांची वाढ झाली आहे. सरकारने दरमहा दर वाढवून एलपीजीवरील सबसिडी काढून टाकली. या मासिक वाढीमुळे मे 2020 पर्यंत सबसिडी काढून टाकली गेली. घरगुती स्वयंपाकाच्या गॅसची किंमत गेल्या सात वर्षांत दुप्पट झाली आहे. घरगुती गॅसची किरकोळ विक्री किंमत 1 मार्च 2014 रोजी 410 रुपये प्रति सिलिंडर होती. आता ही वाढ दुप्पट झाली आहे.
हे वाचलं का?
दिल्लीमध्ये 14.2 किलो सिलिंडरची सबसिडीशिवाय किंमत 859.50 रुपयांवरून 884.50 रुपये झाली. कोलकातामध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत आता 875.50 रुपयांऐवजी 911 रुपये झाली, 900.5 रुपये मोजावे लागतील.दिल्लीमध्ये 19 किलो व्यावसायिक गॅसची किंमत 1693 रुपये आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत कोलकातामध्ये 1,772 रुपये, मुंबईत 1,649 रुपये आणि चेन्नईमध्ये 1,831 रुपये प्रति सिलिंडर आहे.
एलपीजी सिलिंडर यंदा 190.5 रुपयांनी महागले
ADVERTISEMENT
सरकारी तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरच्या किमती बदलतात. वर्ष 2021 च्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीत दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत 694 रुपये होती, जी आता वाढून 884.50 रुपये झाली. अशा प्रकारे एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत आतापर्यंत 8 महिन्यांत 190.50 रुपयांची वाढ झाली.
ADVERTISEMENT
LPG सिलिंडरचे दर कुठे पाहाल?
एलपीजी सिलिंडरची किंमत तपासण्यासाठी तुम्हाला सरकारी तेल कंपनीच्या वेबसाईटवर जावे लागेल. येथे कंपन्या दर महिन्याला नवीन दर जारी करतात. (https://iocl.com/Products/IndaneGas.aspx) या लिंकवर तुम्ही तुमच्या शहरातील गॅस सिलिंडरची किंमत तपासू शकता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT