ठाकरे सरकारकडून राज्यपालांच्या हवाई प्रवासाला नकार!
ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातील शीतयुद्ध दिवसेंदिवस सुरुच आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल आणि ठाकरे सरकारमधील दरी आणखी वाढत चालली असल्याचं दिसून येत आहे. त्यातच आज राज्यपालांच्या हवाई प्रवासाला राज्य सरकारकडून परवानगीच नाकारण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राज्यपाल कोश्यारी हे जेव्हा विमानात बसले तेव्हा त्यांना ऐनवेळी सांगण्यात आलं की, उड्डाणासाठी विमानाला […]
ADVERTISEMENT

ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातील शीतयुद्ध दिवसेंदिवस सुरुच आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल आणि ठाकरे सरकारमधील दरी आणखी वाढत चालली असल्याचं दिसून येत आहे. त्यातच आज राज्यपालांच्या हवाई प्रवासाला राज्य सरकारकडून परवानगीच नाकारण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राज्यपाल कोश्यारी हे जेव्हा विमानात बसले तेव्हा त्यांना ऐनवेळी सांगण्यात आलं की, उड्डाणासाठी विमानाला परवानगी नाही. त्यामुळे आता या सगळ्या प्रकारावरुन आता भाजपच्या नेत्यांनी देखील टीका करण्यासा सुरुवात केली आहे.
राज्यपालांसोबत नेमकं काय घडलं?
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना आज (11 फेब्रुवारी) सकाळी देहरादून येथील लाल बहादूर अॅकेडमी येथील कार्यक्रमासाठी जायचं होतं. त्यासाठी ते विमानात देखील बसले. मात्र, त्याचवेळी त्यांना सांगण्यात आलं की, हा विमानाला उड्डाणासाठी सरकारकडून परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यपालांना त्या विमानातून पुन्हा खाली उतरावं लागलं. त्यानंतर राज्यपालांनी व्यावसायिक विमानातून प्रवास करणं पसंत केलं.
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात आल्यापासून राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात कोणत्या ना कोणत्या विषयावरुन वाद सुरुच आहेच. मात्र आता हे वाद अधिक चिघळत जात असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे ठाकरे सरकार आणि भाजप यांच्यात यावरुन एकमेकांवर टीका-टिप्पणी सातत्याने सुरु आहे.