LPG गॅस ते सोन्याचे दर, 1 एप्रिलपासून होणार ‘हे’ 6 मोठे बदल… थेट होणार तुमच्यावर परिणाम!
1 एप्रिलपासून घरगुती गॅस (LPG gas), सोने-चांदी, इन्शुरन्स पॉलिसी, कार खरेदी, औषधाचे दर आणि टॅक्समध्ये बदल होणार आहे. सर्वसामन्यांसाठी महत्वाच्या असणाऱ्या या सर्व गोष्टींमध्ये मोठे बदल होणार आहे. हे बदल कसे असतील ते पाहूयात.
ADVERTISEMENT
Changes from 1st April 2023 : 2022 चे आर्थिक वर्ष (Financial Year) संपल्यात जमा आहे. आणि 2023 चे आर्थिक वर्ष सुरु व्हायला अवघा 1 दिवस उरला आहे. दर महिन्याला अनेक बदल होत असतात, त्याप्रमाणेच आता 1 एप्रिलपासून नवीन बदल होणार आहेत. या बदलाचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होणार आहेत. नेमके हे बदल कोणते असणार आहेत. या बदलाचा परिणाम सर्वसामन्यांवर कसा होणार आहे. हे जाणून घेऊयात.(these 6 big changes happen from april 1st direct effect common man)
ADVERTISEMENT
1 एप्रिलपासून घरगुती गॅस (LPG gas), सोने-चांदी, इन्शुरन्स पॉलिसी, कार खरेदी, औषधाचे दर आणि टॅक्समध्ये बदल होणार आहे. सर्वसामन्यांसाठी महत्वाच्या असणाऱ्या या सर्व गोष्टींमध्ये मोठे बदल होणार आहे. हे बदल कसे असतील ते पाहूयात.
एलपीजी गॅसचे दर
एलपीजी गॅसच्या (LPG gas) दरात नेहमीच बदल होत असतात. गेल्या काही महिन्यांपासून हे बदल होतायत. 1 एप्रिलपासून देखील हे बदल होणार असल्याचे बोलले जात आहे. मार्च महिन्यात घरगुती गॅसच्या किंमतीत 50 रूपयांची वाढ झाली होती. तर व्यावसायिक गॅसच्या किंमतीत 350 रूपयांची वाढ करण्यात आली होती. मार्चमध्ये गॅस दरात वाढ झाल्याने एप्रिलमध्ये पुन्हा एलपीजीच्या दरात वाढ होण्याची शक्यता कमी आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा : राम नवमी सोहळा सुरु असतानाच मोठी दुर्घटना; मंदिराच्या विहिरीतच 25 जण बुडाले
सोन्या संदर्भात नवीन नियम
सोन्याचे (Gold) दागिने विक्री संदर्भात नवीन नियम लागू होणार आहे. नवीन नियमानुसार 31 मार्च 2023 पासून 4 अंकाच्या हॉलमार्क युनिक आयडेंटीफिकेशन असणाऱ्या दागिन्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात येणार आहे. तर 1 एप्रिल 2023 पासून 6 डिजिटवाल्या हॉलमार्क HUID दागिने विक्री करता येणार आहे.
इन्शुरन्स पॉलिसी
पॉलिसीच्या हाय प्रीमीयर इन्शुरन्सवर होणाऱ्या कमाईवर टॅक्स लावण्याचा निर्णय बजेट 2023 मध्ये झाला होता. त्यानुसार जर तुमच्या इन्शुरन्सचा वार्षिक प्रिमियम 5 लाखाहून जास्त असले तर, त्यापासून होणाऱ्या कमाईवर टॅक्स लागणार आहे. आतापर्यंत इन्शुरन्समधून होणारी कमाई टॅक्स फ्री होती आणि याचा फायदा हाई नेटवर्थ इंडिविज्युअल्सला व्हायचा. 1 एप्रिल 2023 पासून हा नियम बदलणार आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : राम नवमी स्पेशल: हेलिकॉप्टरमधून करा अयोध्या दर्शन, तिकिटाची किंमत फक्त…
गोल्ड
1 एप्रिलपासून फिजिकल गोल्डचे ई गोल्डमध्ये आणि ई गोल्ड फिजिकल गोल्डमध्ये कन्वर्ट करण्यासाठी कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागणार नाही. या संबंधित घोषणा बजेट 2023 मध्ये झाली होती.
ADVERTISEMENT
कार खरेदी महागणार
एप्रिलपासून कार (Car Buying) खरेदी महागणार आहे. देशात BS-6 चा पहिला टप्पा संपणार आहे आणि दुसरा टप्प्याला सुरुवात होत आहे. नवीन नियमानुसार कार अपडेट करण्यासाठी झालेल्या खर्चाची भरपाई करण्यासाठी ऑटो कंपन्या ग्राहकांवर बोजा वाढवू शकतात. यामुळे 1 एप्रिलपासून कार खरेदी महागणार आहे.
औषधांचे दर
एप्रिलच्या 1 तारखेपासून औषधांचे दर (Medicine rate) वाढणार आहे. पेन किलर,अॅटी बायोटीक, एंटी इन्फेक्टीव आणि कार्डीयकची औषधे महाग होऊ शकतात. ही औषधे 12 टक्के महागणार आहे. दरम्यान औषधाचे दर वाढवण्याचे काम नेशनल फार्मास्युटीकल प्राईसिंग अथॉरीटी करते.
”हे” बदलही होणार
अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी नवीन कर प्रणाली संबंधित केलेल्या घोषणांची अंमलबजावणी होणार आहे. यामध्ये 7 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर कर सूट समाविष्ट आहे. तसेच सीनियर सिटीजन सेविंग स्किममधील गुंतवणूक 15 लाख रूपयांनी वाढवून 30 लाख करण्यात आली आहे. पोस्ट ऑफीस मंथली इन्कम स्किममधील सिंगल अकाऊंट होल्डरची मर्यादा 4 लाख रूपयांनी वाढवून 9 लाख रूपये करण्यात आली आहे. या गोष्टी 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT