देवेंद्र फडणवीस: “फॉक्सकॉनसाठी ज्यांनी काहीच केलं नाही ते आमच्याकडे बोट दाखवत आहेत”
महाराष्ट्राचा औद्योगिक क्षेत्रात पहिला क्रमांक होता. मागच्या दोन वर्षात आपण पहिल्या क्रमांकावरून पाचव्या-सहाव्या क्रमांकावर गेलो. गुजरातला नावं ठेवून आणि त्यांच्या विरोधात भाषणं करून आपण पहिल्या क्रमांकावर जाणार नाही. त्यासाठी तशी धोरणं असावी लागतात असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. एवढंच नाही तर फॉक्सकॉन महाराष्ट्रात राहवा म्हणून ज्यांनी काहीही प्रयत्न केले […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्राचा औद्योगिक क्षेत्रात पहिला क्रमांक होता. मागच्या दोन वर्षात आपण पहिल्या क्रमांकावरून पाचव्या-सहाव्या क्रमांकावर गेलो. गुजरातला नावं ठेवून आणि त्यांच्या विरोधात भाषणं करून आपण पहिल्या क्रमांकावर जाणार नाही. त्यासाठी तशी धोरणं असावी लागतात असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. एवढंच नाही तर फॉक्सकॉन महाराष्ट्रात राहवा म्हणून ज्यांनी काहीही प्रयत्न केले नाहीत ते आम्हाला शिकवत आहेत असंही फडणवीस म्हणाले.
ADVERTISEMENT
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरुन वातावरण तापलं, राष्ट्रवादी- शिवसेना उतरली रस्त्यावर
देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
वेदांता फॉक्सकॉनच्या संदर्भात विषय गाजतोय. अनिल अग्रवाल यांनी सगळं ट्विट करून सांगितलं. पण ३ पत्रकार आहेत जे त्यांच्या संस्थेसाठी नाही तर राजकीय स्वार्थासाठी काम करतात. ज्या दिवशी मी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यादिवशी मी CEO एमआयडीसीला बोलावलं आहे. त्यानंतर वेदांताची चौकशी केली. मला त्यांनी सांगितलं की गुजरातकडे वेदांताचा कल आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. आम्ही दोघांनी त्यांच्याशी चर्चा केली. मात्र तोपर्यंत गुजरातकडे आम्ही गेलो आहोत.
हे वाचलं का?
प्रकल्प गुजरातला न्यायचा निर्णय महाविकास आघाडीच्या काळातलाच
आपण चांगलं पॅकेज त्यांना ऑफर केलं होतं. मात्र शेवटी त्यांनी मला सांगितलं की आमचा हा निर्णय झाला आहे. मात्र पुढची सगळी गुंतवणूक यापेक्षा जास्त गुंतवणूक आम्ही महाराष्ट्रात केला. आमचं सरकार येण्याआधीच फॉक्सकॉनचा निर्णय झाला होता. ज्यांनी काहीच केलं नाही ते आम्हाला आता शहाणपणा शिकवत आहेत. आम्ही प्रकल्प महाराष्ट्रात राहावा म्हणून आम्ही निकराचे प्रयत्न केले. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुढच्या दोन वर्षात महाराष्ट्र गुजरातच्या पुढे नेऊन दाखवणार अशीही घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.
फॉक्सकॉन प्रोजेक्टबद्दल सुभाष देसाई खोटं बोलताहेत का? व्हायरल बातमीमागचं सत्य काय?
ADVERTISEMENT
आमची सत्ता असताना महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात नंबर वन होता
जेव्हा आमची सत्ता होती तेव्हा पाच वर्षे महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर ठेवलं होतं. आता जे बोलत आहेत त्यांनीच महाराष्ट्राला औद्योगिक क्षेत्रात खाली आणलं आणि गुजरातला पहिल्या क्रमांकावर नेलं. शेवटी उद्योजक तुमच्याकडचं वातावरण कसं आहे हे बघत असतो.
ADVERTISEMENT
३ लाख ५० हजार कोटींचा रिफायनरीचा प्रकल्प राज्यात का होऊ दिला नाही?
माझा सवाल आहे की या महाराष्ट्रात ३ लाख ५० हजार कोटींची गुंतवणूक होऊन देशातली सर्वात मोठी रिफायनरी येणार होती. ही देशातल्या इतिहासतली सर्वात मोठी गुंतवणूक होती. एका गुंतवणुकीने पाच लाख रोजगार आपण देऊ शकलो असतो. त्यापेक्षाही महत्त्वाचं काय? तर गुजरातची अर्थव्यवस्था पाहिली तर त्यात दोन गोष्टींचा वाटा आहे. पहिला वाटा जामनगरच्या रिफायनरीचा आणि दुसरा वाटा आहे तो मुंद्रा पोर्टचा. या रिफायनरीपेक्षा चौपट मोठी रिफायनरी महाराष्ट्रात तयार झाली असती तर महाराष्ट्र पुढचे दहा वर्षे पुढे गेला असता. मात्र दुर्दैवाने रिफायनरीला विरोध झाला. ती होऊ दिली नाही. आता ती आम्ही करणार आहोत. मात्र आता ती स्केल डाऊन झाली असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. लघु उद्योग भारती अधिवेशनात ते बोलत होते.
आपल्याकडे गुंतवणूकदार बघत असतो की वातावरण कसं आहे? बुलेट ट्रेन आपण बंद केली. २० हजार कोटींची गुंतवणूक केलेली मेट्रो ३ थांबवली. मुंद्रा पोर्टपेक्षा मोठा आणि जगातला सगळ्यात चांगला पोर्ट वाढवणला करू इच्छित होतो. जगातलं कुठलंही जहाज तिथे येऊ शकतं. मात्र तो प्रोजेक्ट होऊ दिला नाही. एकटं जेएनपीटी किती पुरणार? असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. आपण मोठा पोर्ट आपण वाढवणला करू शकत होतो. तो होऊ दिला नाही असंही फडणवीस म्हणाले.
आमचं धोरण एकच सगळं बंद करणार, मग गुजरातच्या पुढे कसं जाणार? रिफायनरी आणि वाढवण बंदर हेजरी केल असतं तरीही महाराष्ट्र १० वर्षे पुढे गेला असता. अशात आम्ही अपेक्षा करतो की गुंतवणूक आली पाहिजे, असं होत नसतं. गेल्या दोन वर्षात आपण पाहिलं की भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात झाला. वेगवेगळ्या सबसिडी मिळवण्यासाठी १० टक्के रक्कम द्यावी लागत होती. आज जर तुमच्या राज्यात सबसिडीसाठी लाच द्यावी लागत असेल तर काय अवस्था होईल?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT