बारामतीजवळ उसाने भरलेल्या ट्रॉलीला कारची धडक, भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
वसंत मोरे, प्रतिनिधी, बारामती ऊसाने भरलेल्या ट्रॉलीला कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात बारामतीतल्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. बारामती पुणे रस्त्यावर तरडोली गावाजवळ बुधवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. या अपघातात बारामतीतले सराफ व्यावसायिक श्रेणिक भंडारी यांच्या कुटुंबातील व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये अश्विनी श्रेणिक भंडारी (वय 48), मिलिंद श्रेणिक […]
ADVERTISEMENT

वसंत मोरे, प्रतिनिधी, बारामती
ऊसाने भरलेल्या ट्रॉलीला कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात बारामतीतल्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. बारामती पुणे रस्त्यावर तरडोली गावाजवळ बुधवारी रात्री उशिरा हा अपघात झाला.
या अपघातात बारामतीतले सराफ व्यावसायिक श्रेणिक भंडारी यांच्या कुटुंबातील व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये अश्विनी श्रेणिक भंडारी (वय 48), मिलिंद श्रेणिक भंडारी (वय 24), कविता उदय शहा (वय 62 रा. सर्व सुभाष चौक बारामती) यांचा समावेश आहे तर बिंदिया सुनील भंडारी या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना पुण्यातल्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.