Tokyo Olympic 2020 : P V Sindhu ने पदक जिंकल्यानंतर वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

मुंबई तक

Tokyo Olympics मध्ये मीराबाई चानूननंतर बॅडमिंटनपटून पी. व्ही. सिंधूने ब्राँझ मेडल जिंकलं आहे. सिंधूच्या या कामगिरीनंतर तिचे वडील पी. व्ही. रामणा यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. सिंधूचे प्रशिक्षक पार्क यांचे रामाणा यांनी विशेष आभार मानले आहेत. लागोपाठ दोन ऑलिम्पिकमध्ये मेडल पटकावणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे याचंही मला समाधान आहे असंही रामाणा म्हणाले. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

Tokyo Olympics मध्ये मीराबाई चानूननंतर बॅडमिंटनपटून पी. व्ही. सिंधूने ब्राँझ मेडल जिंकलं आहे. सिंधूच्या या कामगिरीनंतर तिचे वडील पी. व्ही. रामणा यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. सिंधूचे प्रशिक्षक पार्क यांचे रामाणा यांनी विशेष आभार मानले आहेत. लागोपाठ दोन ऑलिम्पिकमध्ये मेडल पटकावणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे याचंही मला समाधान आहे असंही रामाणा म्हणाले.

‘तिचा पराभव झाला, त्यानंतरही माझं मी तिच्याशी बोलणं झालं. तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू होतो. माझ्यासाठी विजय मिळव असं मी सिंधूला सांगितलं. तिने आज आक्रमक खेळ केला. 3 तारखेला सिंधू दिल्लीला येणार आहे. तेव्हा मी तिला दिल्लीला घ्यायला जाणार आहे. सिंधूला आणखी बराच पल्ला गाठायचा आहे. पुढच्या ऑलिम्पिकमध्येही ती खेळेल असा मला विश्वास आहे. खेळावर ती लक्ष केंद्रीत करते. हा खेळ ती एंजॉय करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचं कौतुक केलं आहे आणि तिला म्हणाले आहेत की टोकियोहून परत आलीस की आपण सोबत आईसक्रिम खाऊ. त्यामुळे सिंधू जेव्हा परत येईल तेव्हा ती पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आईसक्रिम खाणार आहे ‘ असंही तिच्या वडिलांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधूचं अभिनंदन केलं आहे. सिंधूने आज जो खेळ केला आणि जी पदकाची कमाई केली त्यामुळे भारताची मान उंचावली आहे. या आशयाचं ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिंधूचं अभिनंदन केलं आहे.

हे वाचलं का?