पुणे-सातारा मार्गावर ट्रॅव्हल्स बस अचानक आग; सुदैवाने जीवित हानी टळली
पुणे-सातारा महामार्गावर शिंदेवाडी गावच्या हद्दीत ट्रॅव्हल्स मिनी बसने अचानक पेट घेतला. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही, मात्र बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. ही घटना सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास घडली. पुणे-सातारा मार्गावरून सातार्याच्या दिशेने जाणाऱ्या मिनी बस कात्रज बोगद्याच्या बाहेर आल्यानंतर बसचा इंजिनमध्ये शॉर्टसर्किट होऊन इंजिनने अचानक पेट घेतला. त्यावेळी बसमध्ये […]
ADVERTISEMENT
पुणे-सातारा महामार्गावर शिंदेवाडी गावच्या हद्दीत ट्रॅव्हल्स मिनी बसने अचानक पेट घेतला. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही, मात्र बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. ही घटना सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
ADVERTISEMENT
पुणे-सातारा मार्गावरून सातार्याच्या दिशेने जाणाऱ्या मिनी बस कात्रज बोगद्याच्या बाहेर आल्यानंतर बसचा इंजिनमध्ये शॉर्टसर्किट होऊन इंजिनने अचानक पेट घेतला. त्यावेळी बसमध्ये 15 प्रवाशी प्रवास करत होते. गाडीने अचानक पेट घेतल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. इंजिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रसंगावधान दाखवत गाडी तात्काळ बाजूला घेतली. चालकाने गाडी बाजूला घेतात घाबरलेले प्रवासी तातडीने गाडी बाहेर पडले.
त्या ठिकाणी असलेल्या वेल्हे तालुक्यातील भाऊ दसवडकर व बाळासाहेब माने यांनी प्रवाशांना दिलासा देत स्थानिकांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीची तीव्रता जास्त असल्याने बस पूर्णपणे जळून खाक झाली. दरम्यान, अग्निशमन दलाच्या यंत्रणेला पाचारण करण्यात आले. घटनास्थळी अग्निशमन दलाची वाहने आली आणि त्यांनी आग आटोक्यात आणली.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT