Nilu Kohli : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या पतीचा बाथरुममध्ये घसरुन मृत्यू
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री नीलू कोहली यांचे पती हरमिंदर सिंग यांचे शुक्रवारी (24 मार्च) दु:खद निधन झाले. यामुळे नीलू यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री नीलू कोहली यांचे पती हरमिंदर सिंग यांचे शुक्रवारी (24 मार्च) दु:खद निधन झाले. यामुळे नीलू यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पतीच्या निधनाने नीलू यांना मोठा धक्का बसला आहे. हरमिंदर सिंग यांना स्वास्थ संबंधित कोणतीही समस्या नव्हती. यामुळे अचानक घडलेल्या या घटनेमुळे प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT
अभिनेत्री नीलू कोहली यांच्या पतीचा मृत्यू कसा झाला?
शुक्रवारी हरमिंदर सिंग दुपारच्या सुमारास गुरूद्वारामध्ये गेले होते. घरी परतल्यानंतर, ते बाथरूममध्ये गेले असताना त्यांचा पाय घसरला आणि ते पडले. नंतर, घरात काम करणारा मदतनीस हरमिंदर यांना शोधत होता. यावेळी हरमिंदर सिंग बेडरूममध्ये न दिसल्याने मदतनीसाने बाथरूममध्ये जाऊन पाहिले. तर तिथेच हरमिंदर हे निपचीत पडले असल्याचं त्याला दिसून आलं. त्यानंतर त्याने हरमिंदर यांना उचलून तात्काळ रूग्णालयात नेलं. मात्र, रुग्णालयात जाण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.
BMC: ‘ठाकरेंच्या’ भेटीनंतर फडणवीसांनी काढलं नवं अस्त्र, विधानसभेत काय घडलं?
हरमिंदर सिंग यांच्या पार्थिवावर रविवारी (26 मार्च) अंत्यसंस्कार होणार आहे. कारण त्यांचा एक मुलगा, मर्चंट नेव्हीमध्ये काम करतो. त्याची सर्वजण वाट पाहत आहेत. पतीच्या निधनाने निलू कोहली खूपच खचल्या आहेत. कुटुंब आणि जवळचे लोक त्यांची काळजी घेत आहेत. तसंच सर्व चाहते त्यांना धीर देत आहेत. मनोरंजन क्षेत्रासाठी गेले काही महिने दुःखाचे गेले. कारण अनेक दिग्गज कलाकार किंवा सेलिब्रिटींचं मागील काही महिन्यांमध्ये निधन झालं आहे.
हे वाचलं का?
कोण आहेत नीलू कोहली?
नीलू कोहली या अनेक मालिकांमध्ये तसंच, चित्रपटांमध्ये दिसल्या आहेत. त्यांनी ‘शास्त्री सिस्टर्स’ आणि इतर अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. तसेच नीलू कोहली यांनी ‘हाऊसफुल 2’, ‘पटियाला हाऊस’ आणि ‘हिंदी मीडियम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT