BMC: ‘ठाकरेंच्या’ भेटीनंतर फडणवीसांनी काढलं नवं अस्त्र, विधानसभेत काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Deputy Chief Minister Devendra Fadnavis has tried to surround Uddhav Thackeray
Deputy Chief Minister Devendra Fadnavis has tried to surround Uddhav Thackeray
social share
google news

BMC 12 thousand crore work and CAG Audit: मुंबई: मुंबई महापालिकेच्या (BMC) कोरोना (Corona) काळातील जी नॉन-कोव्हिड कामं (Non-Covid Work) झाली त्याच्या 12 हजार कोटींच्या कामाबाबत कॅगकडून (CAG) अहवाल जारी करण्यात आला. आपल्या या ऑडिटमध्ये कॅगने महापालिकेच्या कामाबाबत अनेक गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. याच सगळ्याविषयी आज (25 मार्च) विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अहवालाविषयी सभागृहाला माहिती दिली. यावेळी फडणवीसांनी जरी कॅगच्या अहवालाबाबत भाष्य केलं तरी त्यांचा सगळा रोख हा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडेच होता. (devendra fadnavis targets uddhav thackeray while presenting the cag report in the assembly on irregularities in bmc 12 thousand crore work)

कॅगने जे ऑडिट केलं आहे ते उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असलेल्या काळातील आहे. तसेच याच दरम्यान, शिवसेनेची सत्ता देखील महापालिकेत होती. म्हणून आता कॅग ऑडिटच्या माध्यमातून फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना घेरण्याची सुरुवात केली आहे.

अधिक वाचा- हर्षवर्धन जाधव नव्या पक्षात; राजकीय निवृत्तीची घोषणा विसरुन पुन्हा सक्रिय

काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र विधानसभा परिसरात एकत्र गप्पागोष्टी करत येताना पाहायला मिळाले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात एक वेगळीच चर्चा सुरू झाली होती. यावेळी फडणवीस आणि ठाकरेंमध्ये पुन्हा दिलजमाई होणार का? या चर्चेला देखील उधाण आलं होतं. मात्र, असं असताना आज थेट महापालिकेच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा मुद्दा पुढे सरसावत फडणवीसांनी एकप्रकारे ठाकरेंना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘मुंबई महापालिकेकडून अनियमितता’, देवेंद्र फडणवीस विधानसभेत काय म्हणाले?

‘मुंबई महापालिकेच्या कोरोना काळातील 12 हजार कोटींच्या कामाचं कॅगकडून ऑडिट करण्यात आलं. कोव्हिडच्या काळातील जी कामं होती त्याबाबत महापालिकेने आक्षेप घेतला होता की, कोरोना काळातील कामांचं ऑडिट करता येणार नाही. तर तो मुद्दा विचाराधीन आहे. पण नॉन-कोव्हिड या काळातील साधारण 28 नोव्हेंबर 2019 ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत कोव्हिडची खरेदी सोडून इतर खरेदीच्या किंवा निविदांच्या संदर्भात ऑडिट झाला आहे. 14 नोव्हेंबर 2022 ला कॅगने याला मान्यता दिली आणि त्यानंतर हा ऑडिट झाला.’

‘त्यात प्रमुख निरिक्षण असं आहे की, मुंबई महापालिकेने दोन विभागांची 20 कामं ही कोणतीही निविदा न काढता केलं आहे. जवळपास 214 कोटींची कामं आहेत की, जी कोणतीही टेंडर न काढता केली आहेत. त्यानंतर 4755 कोटीची कामं, एकूण 64 कंत्राटदार आणि बीएमसी यांच्यामध्ये करारच झाला नाही. त्यामुळे महापालिकेला त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्याचा अधिकारच राहिला नाही. त्यासोबत 3355.57 कोटीच्या 3 विभागांच्या 13 कामांना थर्ड पार्टी ऑडिटरची नियुक्तीच केली नाही. त्यामुळे ही कामं नेमकी कशी झाली आहेत हे पाहण्याची कुठली यंत्रण उपलब्ध नाही.’

ADVERTISEMENT

अधिक वाचा- शंभूराज देसाईंकडून घेतली पुडी… शिंदे बोलत असताना भरत गोगावलेंनी बघा काय केलं

‘कॅगने या संदर्भात असं म्हटलं आहे की, पारदर्शकतेचा अभाव आहे, सिस्टमॅटिक प्रॉब्लेम आहे, ढिसाळ नियोजन आहे आणि निधीचा निष्काळजीपणे वापर करण्यात आला आहे.’

ADVERTISEMENT

‘हा फक्त ट्रेलर आहे…’

‘याचप्रमाणे अजूनही काही गोष्टी आहेत. पण एकूणच हा जो काही अहवाल आहे या अहवालाने महापालिकेचा कारभार किती अपारदर्शी आणि भ्रष्ट प्रकारात चालला होता यासंदर्भात सगळ्या गोष्टी उघड केल्यात. खरं तर अध्यक्ष महोदय.. हा अहवाल ट्रेलर आहे. कारण लिमिटेड 12 हजार कोटींच्याच कामांची चौकशी या अहवालात केली आहे.’

अधिक वाचा- राज ठाकरेंनी निवडून आणलेले 13 आमदार सध्या आहेत कुठे?

‘खरं तर पूर्ण चौकशी केली तर काय-काय गोष्टी यात निघतील हे सांगता येत नाही. मात्र, आता हा आपल्या नियमानुसार, लोकलेखा समितीकडे जाईल आणि यातील भ्रष्टाचाराचे जे मुद्दे आहेत त्यासंदर्भात इतरही कुठली कारवाई करण्याची आवश्यकता असेल तर राज्य सरकार करेल.’ असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी एकप्रकारे उद्धव ठाकरेंना इशाराच दिला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT