Eknath Shinde: 'महाराष्ट्रात आम्हाला 'एवढ्या' जागा मिळतील', CM शिंदेंनी आकडाच सांगून टाकला!
Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रात शिवसेना 15 जागा जिंकेल आणि महायुतीत 45 जागांवर विजय मिळवेल असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई Tak ला दिलेल्या मुलाखतीत केलं आहे.
ADVERTISEMENT
CM Eknath Shinde Mumbai Tak Exclusive Interview: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) मध्ये अवघ्या देशाचं लक्ष हे महाराष्ट्राकडे लागून राहिलं आहे. कारण महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा सध्याच्या घडीला कोणालाही अंदाज बांधता येत नाहीए. मात्र, अशावेळी राज्याचे मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रात शिवेसना (शिंदे गट) आणि महायुती किती जागा जिंकणार याचा थेट आकडाच सांगून टाकला आहे. (lok sabha election 2024 cm eknath shinde has claimed that shiv sena 15 and mahayuti will get more than 45 seats in maharashtra mumbai tak exclusive interview)
ADVERTISEMENT
मुंबई Tak चे संपादक साहिल जोशी यांनी घेतलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाला तब्बल 15 पैकी 15 जागा मिळतील असा दावा केला आहे. 'सध्या महाराष्ट्रात जे पर्सेप्शन महायुतीबाबत केलं जात आहे.. त्या सगळ्याला अनपेक्षित धक्का देणारा निकाल महाराष्ट्रात पाहायला मिळेल.' असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
CM एकनाथ शिंदेंनी जागांचा आकडाच सांगून टाकला..
प्रश्न: ही निवडणूक तुमच्यासाठी जिंकू किंवा मरू असं आहे का? तुमचं पुढचं भवितव्य त्यावर अवलंबून आहे का?
हे वाचलं का?
एकनाथ शिंदे: असं काही नाही.. ही निवडणूक आमच्यासाठी चांगली आहे. आमच्या चांगल्या जागा येतील. संघर्षाशिवाय मजा पण नाही. आयतं मिळालं तर काय मजा?
हे ही वाचा>> 'BJP हा फुटलेला पक्ष नाही मात्र शिवसेना..', CM शिंदेंचं मोठं विधान
लढून जिंकणं याला फार महत्त्व आहे. मी लढाऊ आहे.. त्यामुळे आयतं घरी बसून मिळावं अशी माझी कधी अपेक्षा नव्हती. ज्यांना आहे त्यांनी मिळवलं आणि घालवलं पण..
ADVERTISEMENT
आज मी सांगतो खात्रीने.. महाराष्ट्रात महायुतीच्या जागा.. ज्या पद्धतीने बाहेर पर्सेप्शन चाललं आहे. अनपेक्षितपणे जागा महायुतीला मिळतील. आमचं 45 चं स्वप्न पूर्ण होईल आणि 15 पैकी 15 आमच्या (शिवसेनेच्या) जागा निवडून येतील.
शंभर टक्के हरवणार.. कामाच्या जोरावर, विकासाच्या जोरावर.. केलेली काम राज्याने आणि केंद्राने.. लोक त्याला पसंती देतील. घरी बसणाऱ्यांना थोडं लोकं पसंती देतात. माणसाला काम पाहिजे. माणसाच्या संकटात उभं राहिलं पाहिजे.
ADVERTISEMENT
प्रश्न: तुम्ही म्हणतात त्या पद्धतीने तुमच्या 15 पैकी 15 जागा निवडून आल्या तर विधानसभेच्या वेळेस जागा वाटप करताना तुमची बाजू मजबूत होईल असं वाटतं?
एकनाथ शिंदे: आता मी फक्त लोकसभेचं बोलतोय... माझा फोकस लोकसभेवर आहे. नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यावर माझा फोकस आहे. महाराष्ट्रातून 45 जागा देऊन मोदीजींचे हात बळकट करण्यावर माझा फोकस आहे.
हे ही वाचा>> EVM ची पूजा करणाऱ्या रुपाली चाकणकर प्रचंड अडचणीत
असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात महायुतीला 45 जागा मिळतील असा ठामपणे दावा केला आहे. तसेच या निकालाचा कोणताही परिणाम हा त्यांच्या राजकीय वाटचालीवर होणार नाही असाही दावा त्यांनी केला आहे.
मुख्यमंत्री शिंदेंनी केलेला हा दावा नेमका किती खरा ठरणार यासाठी आपल्या सगळ्यांना 4 जूनपर्यंत वाट पाहावी लागेल. त्यानंतरच महाराष्ट्रातील पुढील राजकारण नेमकं कसं असेल हे स्पष्ट होईल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT