Rohit Pawar : 'बारामतीत 200 कोटीच्या आसपास पैसै वाटप, एका मतदाराला...', रोहित पवारांचा खळबळजनक दावा

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

rohit pawar big allgation on ajit pawar distrubuting money baramati voter lok sabha election 2024 supriya sul vs sunetra pawar
बहिणीला पाडण्यासाठी सहा महिन्यापूर्वी दादा संपुर्ण यंत्रणा घेऊन गेले होते.
social share
google news

Rohit Pawar Big Allegation : लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात बारामती लोकसभा मतदार संघात आज मतदान पार पडते आहे.  या मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांनी  'बारामती मतदारसंघात चक्क पोलीस ‘बंदोबस्तात’ पैशांचा पाऊस पडतोय' असे खळबळजनक ट्विट केले आहे.या ट्विटनंतर रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन झोपडपट्टयांना  2500 रूपये आणि ज्यांच्याकडे गाड्या आहेत त्यांना 5 हजार रूपये वाटल्याचा आरोप केला आहे. तसेच पैसै वाटण्याचा हा आकडा 200 कोटीच्या आसपास असल्याचा खुलासा देखील रोहित पवारांनी केला आहे.  (rohit pawar big allgation on ajit pawar distrubuting money baramati voter lok sabha election 2024 supriya sul vs sunetra pawar)

ADVERTISEMENT

रोहित पवार पुढे म्हणाले,  दादा (अजित पवार) बरोबर म्हणाले माझं डोकं फिरलंय, 200 कोटी  ते 300 कोटी एवढा मोठा आकडा एका निवडणुकीसाठी...एवढा मोठा आकडा जर आमदारकीसाठी दादांनी वापरला असता तर 144 च्या पुढे आम्ही गेलो असतो.एकहाती सत्ता आली असती अजित दादा मुख्यमंत्री झाले असते, असा टोला रोहित पवारांनी अजित पवारांना लगावला आहे. 

हे ही वाचा : बारामतीतील मतदानासंदर्भात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

तुम्ही बहिणीला (सुप्रिया सुळे) पाडण्यासाठी अशा गोष्टीचा वापर करता. दुदैव असं की बहिणीला पाडण्यासाठी सहा महिन्यापूर्वी दादा संपुर्ण यंत्रणा घेऊन गेले होते. त्यावेळेस आम्हाला वाटलं की तिसऱ्या कोणाला संधी दिली जाईल. पण त्यांनी घरातलाच उमेदवार उतरवला.त्यामुळे बहिणीने तुमच्यावर जो विश्वास ठेवला त्याचा तुम्ही विश्वासघात केल्याची टीका रोहित पवारांनी अजित पवारांवर केली. 

हे वाचलं का?

तसेच पवार साहेब माझे दैवत होते. म्हणजे पुर्वी होते आता दैवत नाही आहेत. म्हणजेच इथे दादांनी दैवत सोडलं आहे, असे देखील रोहित पवार म्हणाले आहेत. तसेच 17 वर्षापुर्वी हा निर्णय घेतला पाहिजे होता. म्हणजेच 17 वर्ष अजितदादांच्या मनात पवारांविरूद्ध द्वेष होता. सगळी पद घेतल्यानंतर आणि वय बघून त्यांनी हा निर्णय घेतला, असे रोहित पवारांनी सांगितलं. 

हे ही वाचा : 'अजितदादाने आताच मिशा काढल्या पाहिजेत', श्रीनिवास पवारांचं चॅलेंज

रोहित पवारांनी यावेळी शरद पवारांच्या प्रकृतीचीही माहिती दिली आहे. डॉक्टरांनी शरद पवारांना 4-5 दिवस विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. पण साहेब ऐकतील ते साहेब कुठले...आता निवडणुका सुरू असल्याने औषध घेऊन पवार साहेब प्रचाराला सूरूवात करणार आहेत. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT