Baramati Lok Sabha : बारामतीतील मतदानासंदर्भात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
Baramati Lok Sabha Election 2024 : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने तक्रार केल्यानंतर निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
बारामती लोकसभा मतदारसंघ निवडणूक २०२४
निवडणूक आयोगाने सहकारी बँकांचे फोटो पासबुक ओळखपत्र म्हणून स्वीकारण्यास केली बंदी
Baramati Lok Sabha election update : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या तक्रारीची गंभीर दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे. राज्याच्या निवडणूक आयोगाने बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेसंदर्भात महत्त्वाचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत. सहकारी बँकांचे फोटो पासबुक मतदार ओळखपत्र म्हणून न स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत. (The Election Commission has ordered that passbooks of cooperative banks should not be accepted as voter ID cards)
ADVERTISEMENT
बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार आणि शरद पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे.
दरम्यान, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एक शाखेतून मतदानासंदर्भात गैरप्रकार होत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती. या तक्रारीची गंभीर दखल आयोगाने घेतली आहे.
हे वाचलं का?
आयोगाने आदेशात काय म्हटले आहे?
निवडणूक आयोगाने मतदारांची ओळख पटवून घेण्यासाठी मतदान ओळखपत्राशिवाय आधार कार्ड, वाहनचालक परवाना, पॅन कार्ड, फोटो असलेले बँक/पोस्टाचे पासबुक, पासपोर्ट, राज्य व केंद्र शासनाच्या सेवेत असल्याचे ओळखपत्र पुरावे म्हणून तपासण्यात येतात.
हेही वाचा >> अजित पवारांची आई नेमकी कुणाच्या घरी होती?
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रांजल अग्रवाल यांनी बारामती सहकारी बँक आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या माध्यमातून तोतया मतदारांना मतदानाकरिता बनावट पासबुक वितरित करण्यात येत असल्याची तक्रार आहे.
ADVERTISEMENT
त्यामुळे सहकारी बँकांचे फोटो पासबुक मतदार ओळखपत्र म्हणून स्वीकारू नये. मतदारांचे ओळखपत्र तपासताना योग्य काळजी घ्यावी, असे आदेश आयोगाने दिले आहेत.
ADVERTISEMENT
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप
बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदानाआधीच अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आरोप केले की, बारामतीमध्ये पैसे वाटले जात आहेत. मध्यरात्रीपर्यंत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा सुरू होती, त्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. अजित पवारांकडून पैशांचा उतपात सुरू असल्याचा आरोप करण्यात रोहित पवारांनी केला.
हेही वाचा >> 'अजितदादाने आताच मिशा काढल्या पाहिजेत', श्रीनिवास पवारांचं चॅलेंज
त्यावर रोहित पवारांच्या आरोपांना मी महत्त्व देत नाही, असे अजित पवार म्हणाले आहेत. "आजपर्यंत एक लोकसभा आणि सात विधानसभा निवडणुका मी लढवल्या आहेत. मी असले प्रकार कधी करत नाही. पहिल्यापासून विरोधकांतील काही बगलबच्चे अशाच प्रकारचे आरोप करत होते, पण मी त्याला फार महत्त्व देत नाही", अशी भूमिका अजित पवारांनी मांडली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT