इंजिनिअर बहिणींनी एकाच मुलासोबत केलं लग्न, कारण ऐकून तुम्हीही अचंबित व्हाल

मुंबई तक

एकीकडे लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याचा सूर अनेक तरुणांच्या तोंडी असताना एका तरुणाने दोन मुलींशी लग्न केल्याचं समोर आलं. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यात दोन तरुणी एका तरुणाच्या गळ्यात वरमाला घालत आहेत. इंजिनिअर असलेल्या दोन बहिणींनी एकाच तरुणासोबत संसार का थाटला असेल, असा प्रश्न सगळ्यानाच पडला. या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे. रिंकी आणि […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

एकीकडे लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याचा सूर अनेक तरुणांच्या तोंडी असताना एका तरुणाने दोन मुलींशी लग्न केल्याचं समोर आलं. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यात दोन तरुणी एका तरुणाच्या गळ्यात वरमाला घालत आहेत. इंजिनिअर असलेल्या दोन बहिणींनी एकाच तरुणासोबत संसार का थाटला असेल, असा प्रश्न सगळ्यानाच पडला. या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे.

रिंकी आणि पिंकी या तरुणींनी एकाच मुलासोबत थाटला संसार

अकलूजमध्ये एक विवाह सोहळा पार पडला. इतर सोहळ्याप्रमाणेच सर्व काही एकसारखंच होतं. एक गोष्ट वेगळी होती आणि त्यामुळे अनेकजण अचंबितही झाले. त्याच कारण म्हणजे लग्न मंडपात एक नवरदेव होता आणि दोन नवऱ्या. रिंकी आणि पिंकी या जुळ्या बहिणींनी एकाच तरुणासोबत सात फेरे घेतले. महत्त्वाचं म्हणजे बहिणी आयटी इंजिनिअर आहेत आणि एकाच आयटी कंपनीत कार्यरत आहेत.

भारताचे हे चार समलिंगी कपल; सोशल मीडियावर होत आहे यांची भरपूर चर्चा

जुळ्या बहिणींच्या लग्नाचा व्हिडीओ झाला व्हायरल

मुंबईतील कांदिवली येथील रिंकी व पिंकी उच्च शिक्षण घेऊन आयटी क्षेत्रात नोकरी करतात. त्यांनी अंधेरी येथील अतुल या तरुणासोबत शुक्रवारी (3 डिसेंबर) दुपारी हॉटेल गलांडे येथे विवाह केला. या विवाहाचे फोटो व चित्रीकरण व्हायरल झाल्याने अकलूज परिसरात चर्चेला उधाण आले असून, सर्वानाच विवाहाच्या कारणाबद्दलची उत्सुकता जागवली गेली.

हे वाचलं का?

    follow whatsapp