Satyajeet Tambe : ‘ते’ दोन नेते, गुवाहाटी कनेक्शन अन् तांबेंची गुगली

मुंबई तक

Two BJP leaders Guwahati connection and Satyajeet Tambe’s twist: मुंबई: महाराष्ट्रात अवघ्या सहा महिन्यातच पुन्हा एकदा बंडाचं निशाण फडकलं आहे. पक्ष वेगवेगळे, नेते वेगवेगळे असले तरी दोन्हीमध्ये एक समान धागा आहे. शिंदेंच्या बंडात आणि तांबे पिता-पुत्रांनी पुकारलेल्या काँग्रेसविरोधातल्या बंडात एकच कनेक्शन आहे. ते कनेक्शन आहे गुवाहाटी (Guwahati). हे गुवाहाटी कनेक्शन काय, ते दोन नेते कोण […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Two BJP leaders Guwahati connection and Satyajeet Tambe’s twist: मुंबई: महाराष्ट्रात अवघ्या सहा महिन्यातच पुन्हा एकदा बंडाचं निशाण फडकलं आहे. पक्ष वेगवेगळे, नेते वेगवेगळे असले तरी दोन्हीमध्ये एक समान धागा आहे. शिंदेंच्या बंडात आणि तांबे पिता-पुत्रांनी पुकारलेल्या काँग्रेसविरोधातल्या बंडात एकच कनेक्शन आहे. ते कनेक्शन आहे गुवाहाटी (Guwahati). हे गुवाहाटी कनेक्शन काय, ते दोन नेते कोण आणि त्या दहा मिनिटांत काय घडलं हेच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. (two bjp leaders entry in last 10 minutes shinde groups guwahati connection and satyajeet tambes twist)

विधान परिषदेच्या (Vidhan Parishad Election) पाच जागांसाठी 12 जानेवारी हा अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे. अर्ज भरायला काही तास, मिनिटं शिल्लक असताना काँग्रेसनं (Congress) दिल्लीतून सुधीर तांबेंची उमेदवारी जाहीर केली. अर्ज भरायला अवघा एक तास शिल्लक असताना दुपारी दोनच्या ठोक्याला तांबे पिता-पुत्र दोघेही नाशिकच्या विभागीय कार्यालयात पोचले. अर्ज भरायची वेळ संपत आली, तरी तांबे पिता-पुत्र पहिल्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर काही जात नव्हते.

विधान परिषद निवडणूक 2023: पाच मतदारसंघात कोण कोणाला भिडणार?

दुसरीकडे बाहेर भाजपकडून (BJP) इच्छूक असलेले उमेदवारही पक्षाचा एबी फॉर्म मिळेल म्हणून कार्यालयाबाहेर ताटकळत उभे होते. अखेर अर्ज भरायला शेवटची दहा मिनिटं शिल्लक असताना दोघांची इथे एंट्री झाली. त्यांच्याकडे भाजपचा एबी फॉर्म होता. ही दोन्ही नेतेमंडळी भाजपच्या संघटनेत अत्यंत महत्त्वाच्या, अधिकाराच्या पदावर आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp