आर्यन खाननंतर अनन्या पांडेच्या मागे NCBचा ससेमिरा; उद्याही होणार चौकशी!
मुंबई: मुंबई क्रूझ शिप ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB)टीमने आज (21 ऑक्टोबर) दिवसभर चौकशी केली आहे. अनन्याचं नाव आर्यन खानच्या चॅटमधून समोर आलं असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, एनसीबीकडून समन्स मिळाल्यानंतर वडील चंकी पांडे यांच्यासह अनन्या पांडे ही आपला जबाब नोंदविण्यासाठी एनसीबी कार्यालयात गेली होती. जिथे अनेक तास तिचा […]
ADVERTISEMENT

मुंबई: मुंबई क्रूझ शिप ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB)टीमने आज (21 ऑक्टोबर) दिवसभर चौकशी केली आहे. अनन्याचं नाव आर्यन खानच्या चॅटमधून समोर आलं असल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, एनसीबीकडून समन्स मिळाल्यानंतर वडील चंकी पांडे यांच्यासह अनन्या पांडे ही आपला जबाब नोंदविण्यासाठी एनसीबी कार्यालयात गेली होती. जिथे अनेक तास तिचा जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती. मात्र, अनन्याची चौकशी आज (21 ऑक्टोबर) पूर्ण होऊ न शकल्याने तिला उद्या (22 ऑक्टोबर) सकाळी 11 वाजता पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
अनन्या एनसीबी कार्यालयात पोहोचल्यानंतर एनसीबीचे झोनल डिरेक्टर समीर वानखेडे यांनी अनन्या पांडेची चौकशी केली. समीर वानखेडे यांच्यासह तपास अधिकारी व्ही.व्ही. सिंहही उपस्थित होते. तसेच एक महिला अधिकारीही चौकशी दरम्यान तेथे उपस्थित होती.
दरम्यान, NCB ने आज अचानक शाहरुख खानच्या मन्नत बंगाल्याबरोबरच अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरीही धाड टाकली. आर्यन खानच्या व्हॉट्सअॅप चॅटशी अनन्या पांडेचा संबंध असल्याची चर्चा असल्याने एनसीबीच्या पथकाने तिच्या घरावर धाड टाकल्याची माहिती समोर आली आहे.