उद्धव ठाकरे ‘वर्षा’पेक्षा सेना भवनमध्ये जास्त शोभून दिसले, हे दुर्दैव- बच्चू कडू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

केंद्रीय गृहमंत्री अमित महाराष्ट्र दौऱ्यावरती होते. आगामी महापालिका निवडणुकांच्या निमीत्तानं त्यांनी भाजपच्या नेत्यांना कामाला लागण्याचे आदेश दिेले आहेत. मुंबई महापालिकेसाठी १५० जागांचं टार्गेट सेट करुन अमित शाह गेले आहेत. यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंवरती देखील सडकून टीका केली आहे. याला उद्धव ठाकरेंनी देखील उत्तर दिलं आहे. आता यावरती इतर नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी याबाबत आपलं म्हणणं मांडलं आहे. त्याचबरोबर त्यांनी मंत्रिपदाची देखील इच्छा व्यक्त केली आहे.

ADVERTISEMENT

बच्चू कडू काय म्हणाले?

अमित शाह आणि उद्धव ठाकरेंविषयी बोलताना बच्चू कडू म्हणाले ”उद्धवजी खरे बोलले का शाह खरे बोलले हा संशोधनाचा विषय आहे. तो माझा विषय नाही. उद्धव ठाकरे सेना भवनामध्ये शोभून दिसले तेवढे वर्षावर दिसले नाहीत, हे दुर्दैव” असं म्हणत बच्चू कडूंनी ठाकरेंना टोला लगावला आहे.

मंत्रिपदाची इच्छा व्यक्त करताना कडू म्हणाले ”राजकारणी आहे मला मंत्री पदाची अपेक्षा आहे. मी ताकला जाऊन भांडे लपवणारा नालायक माणूस नाही. जेवढा विस्तार लांबेल तेवढी येणारांची संख्या वाढेल हे राजकारण आहे.” आरोग्याच्या बाबतीत दिल्ली एक आदर्श आहे. तसा महाराष्ट्रा व्हावा यासाठी मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांच्याशी बोलणार असं म्हणत बच्चू कडूंनी नाव न घेता आम आदमी पार्टीचे कौतुक केले आहे.

हे वाचलं का?

उद्धव ठाकरे यांनी धोका दिला, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे- अमित शाह

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2019 च्या निवडणुकानंतर भाजपला धोका दिला. राजकारणात काहीही सहन करा, पण धोका सहन करु नका. उद्धव ठाकरेंना जमीन दाखविण्याची वेळ आली आहे. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असे मोठे वक्तव्य करत अमित शाह यांनी शिवसेनेलाही इशारा दिला आहे.

कानाखाली मारली तर ती शरीराला लागते. मात्र आपल्या घरासमोर कानाखाली मारली, तर तिचा आवाज अंतर्मनापर्यंत जातो. आज ती वेळ आली आहे. उद्धव ठाकरेंनी धोका दिला हे बोलण्यात संकोच नको. राजकारणात धोका दिलेल्यांचे राजकारण यशस्वी होत नाही, असेही अमित शाह म्हणाले होते.

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंनी अमित शाहांवरती काय बोलले?

मुंबईत सोमवारी आपण मंगलमूर्ती आणि अमंगलमूर्ती बघितले. गणपतीच्या मंडपात देखील त्यांना राजकारण दिसलं. गणपती जिथे आहे तिथे काही अभद्र बोलू नये पण ते बोलून गेले. गणपती हा बुद्धी दाता आहे, त्यांनी सर्वांना सुबुध्दी द्यावी असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांना टोला लगावला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT