Govt Job: भारतीय सैन्यात नोकरीची सुवर्णसंधी! कोणतीही परीक्षा नाही अन्... काय आहे पात्रता?

मुंबई तक

इंडियन आर्मीकडून (SSC Tech 67th) शॉर्ट सर्व्हिस कमिशन महिला आणि पुरुष उमेदवारांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.

ADVERTISEMENT

कोणत्याही परीक्षेशिवाय भारतीय सैन्यात नोकरी...
कोणत्याही परीक्षेशिवाय भारतीय सैन्यात नोकरी...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भारतीय सैन्यात नोकरीची सुवर्णसंधी!

point

कोणत्याही परीक्षेशिवाय मोठ्या पदांवर होणार भरती...

point

काय आहे पात्रता?

Indian Army Recruitment 2026: इंडियन आर्मी म्हणजेच भारतीय सैन्यात नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या तरुणांसाठी मोठ्या भरतीची बातमी समोर आली आहे. इंडियन आर्मीकडून (SSC Tech 67th) शॉर्ट सर्व्हिस कमिशन महिला आणि पुरुष उमेदवारांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार  joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. 

आर्मी टेक्निकलच्या या नव्या भरतीमध्ये महिला आणि पुरुष दोघांसाठी वेगवेगळे नोटिफिकेशन्स जाहीर करण्यात आले असून अर्ज करण्याची तारीख सुद्धा महिला आणि पुरुष उमेदवारांसाठी वेगवेगळी असणार आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी पुरुष उमेदवार 7 जानेवारी 2026 ते 5 फेब्रुवारी 2026 पर्यंत अर्ज करू शकतात. तसेच, महिला उमेदवारांना 6 जानेवारी 2026 ते 4 फेब्रुवारी 2026 हा अर्ज करण्यासाठी कालावधी निश्चित करण्यात आला आहे. 

शैक्षणिक पात्रता 

या भरतीअंतर्गत, सिव्हिल, आर्किटेक्ट, कंप्यूटर सायन्स, इनफॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मॅकेनिकल अशा विविध इंजीनिअरिंग क्षेत्रात पुरुषांची भरती केली जाणार आहे. अशातच, अर्जदारांकडे संबंधित किंवा समकक्ष क्षेत्रात इंजीनिअरिंगची डिग्री असणं आवश्यक आहे. तसेच, महिलांसाठी सुद्धा इंजीनिअरिंगची डिग्री असणं अनिवार्य असणार आहे. 

हे ही वाचा: धाराशिव : दारू पाजून डोळ्यात लाल तिखट... अनैतिक संबंध टिकवण्यासाठी प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं

वयोमर्यादा 

SSC Tech (एसएससी टेक) महिला आणि SSC Tech (एसएससी टेक) पुरुष पदांसाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवारांसाठी 20 ते 27 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच, 1 ऑक्टोबर 1999 आणि 30 सप्टेंबर 2006 या तारखा लक्षात घेऊन उमेदवारांच्या वयाची गणना केली जाणार आहे. शॉर्टलिस्टिंग, एसएसबी,  PCTA, मेडिकल या टप्प्यांतून उमेदवारांची निवड केली जाईल. यासोबतच, उमेदवारांना कोणत्याच प्रकारची लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. 

हे वाचलं का?

    follow whatsapp