युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची घरवापसी; एअर इंडियाचं विमान भारताच्या दिशेनं झेपावलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष नव्या वळणावर पोहोचला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या पूर्वेकडील दोन भागांना स्वतंत्र राज्य म्हणून घोषित केल्यानंतर तणाव वाढला असून, भारताने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. मंगळवारी एअर इंडियाच्या विमानाने प्रवाशांना घेऊन भारताच्या दिशेनं झेपावलं.

ADVERTISEMENT

युक्रेन-रशिया संघर्ष वाढला असून, व्लादिमीर पुतीन यांनी दोनेत्स्क आणि लुहान्सक या दोन प्रातांना स्वतंत्र दर्जा दिला आहे. याचबरोबर युक्रेनच्या पूर्वेकडील सीमाभागात लष्करी कुमक वाढवली असून, तणाव वाढला आहे.

रशिया – युक्रेनच्या वादाचा भारतावर काय परिणाम होणार?

हे वाचलं का?

युक्रेन-रशिया संघर्षामुळे युद्धाचं वातावरण निर्माण होताना दिसत असून, भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना परत मायदेशी आणण्यासाठी भारताने मोहीम हाती घेतली असून, आज एअर इंडियाच्या विमानाने २४२ भारतीयांना घेऊन भारताच्या दिशेनं उड्डाण केलं.

मिळालेल्या माहितीनुसार एअर इंडियाच्या AI1946 या विमानाने २४२ भारतीयांना घेऊन मंगळवारी (२२ फेब्रुवारी) सकाळी ७:३० वाजता उड्डाण केलं. युक्रेनमधील कीव विमानतळावरून एअर इंडियाच्या विमानानं झेपावलं. आज रात्री १० वाजून १५ मिनिटांनी हे विमान भारतात उतरणार आहे.

ADVERTISEMENT

Russia Ukraine Crisis : रशिया-युक्रेनमधला वाद नेमका काय आहे? या वादाने तुमचा पैसा का बुडवतोय?

ADVERTISEMENT

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान लॅण्ड होणार असल्याची माहिती आहे. यानंतर आता २४ आणि २६ फेब्रुवारी रोजी एअर इंडियाचे दोन विमान युक्रेनमधील भारतीयांना परत आणण्यासाठी जाणार आहेत.

यापूर्वी एअर इंडियाच्या विमानाने युक्रेनसाठी उड्डाण केलेलं नाही. मात्र, तिथे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारताने एअर इंडियाची विमानं पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

एअर इंडियाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात भारतातून युक्रेनसाठी २५६ आसन क्षमता असलेली बोईंग ७८७ ड्रीमलाईनर विमानं पाठवली जातील. युक्रेनमधून भारतात येणारे नागरिक एअर इंडियाच्या बुकिंग ऑफिस, वेबसाईट्स आणि कॉल सेंटर आणि अधिकृत ट्रॅव्हल्स एजंटमार्फत बुकिंग करु शकतात, असं म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT